मलकापूर येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त भव्य शिवशाहीरी पोवाडा कार्यक्रम अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलका...
मलकापूर येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त भव्य शिवशाहीरी पोवाडा कार्यक्रम
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त १४ मे रोजी स्थानिक मराठा मंगल कार्यालय येथे छत्रपती शंभूमहाराज जन्मोत्सव सोहळा व भव्य शिवशाहिरी पोवाडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक समस्त छत्रपती शंभूमहाराज पाईक परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
एकापेक्षा एक निष्णात योध्यांना निष्प्रभ करणारे रणभैरव सेनापती, रणधुरंधर, स्वराज्याचे द्वितीय छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन १४ मे रोजी करण्यात आले आहे. यानिमित्त सायंकाळी ७ ते ९ महाराष्ट्राचे नामवंत युवा शाहीर स्वप्निलदादा डुंबरे नाशिक यांच्या पोवाड्याचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव व पोवाडा कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन समस्त छत्रपती शंभूमहाराज पाईक परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments