सातपुड्यातील दुर्गम पाड्यांवर जनजागृती कार्यक्रमातून गाव प्रमुखांशी आरोग्याच्या विविध विषयांवर चर्चा चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकां...
सातपुड्यातील दुर्गम पाड्यांवर जनजागृती कार्यक्रमातून गाव प्रमुखांशी आरोग्याच्या विविध विषयांवर चर्चा
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
• दि- 15/05/2025 रोजी सातपुड्यातील दुर्गम भागात असलेले ओगाई माता, अकल्या पाडा व ओमाश्या पाडा या तीनही पाड्यावर सामूहिक कार्यक्रम अमळनेर येथील आधार बहुउद्देशीय संस्था व Jpiego यांच्या सुरू असलेल्या AMPLI-PPHI प्रोजेक्ट च्या सहकार्याने एकत्रितपणे घेण्यात आला. कार्यक्रमातून या भागात राहणाऱ्या आदिवासी समुदायाला विशेषता माता आणि बाल आरोग्यासाठीच्या चांगल्या आरोग्य सुविधां तसेच योजनां संदर्भात माहिती तसेच उपाययोजना करण्यासाठी घेण्यात आला विशेषता या कार्यक्रमात या तीनही पाड्यावर एकत्रित महिन्यातून एक दिवस लसीकरण सत्र आयोजित व्हावे तसेच या पाड्यांवर आशा सेविकांची नियुक्ती व्हावी या लोकांच्या प्रमुख विषयांवर चर्चा करण्यात आली. हा उपक्रम गाव पातळीवर तसेच पाड्यांवर अशा जनजागृती कार्यक्रमातून राबविला जात आहे.
• यासाठी आपल्या चोपडा तालुक्याचे आरोग्य दूत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर सर व आधार संस्थेच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील तसेच Jpiego च्या PO - आम्रपाली मुरार , दीपक संदनशिव , भगत सर यांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारचे आरोग्य जनजागृती कार्यक्रम गाव पातळीवर,शाळांवर तसेच पाड्यांवर, वस्त्यांवर राबविले जात आहेत .
• या कार्यक्रमासाठी तिन्ही गावातील गावातील पटेल, गावातील सामाजिक कार्यकर्ते, दाई , Jpiego च्या PO - आम्रपाली मुरार , दीपक संदनशिव , भगत सर तसेच सोबतच प्रोजेक्ट चे Counsellor- ज्ञानेश्वर सोनवणे व CN- सागर पावरा , शिवा बारेला , निशांत कोळी ,प्रिती बारेला, यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम दीपक संदानशिव सर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व प्रस्तावना मांडली
तदनंतर प्राथमिक स्वरूपात गावातील प्रमुखांचा सत्कार करण्यात आला व पथनाट्याच्या माध्यमातून लोकांना सुरक्षित बाळंतपणा संदर्भात माहिती देण्यात आली. यानंतर गाव प्रमुखांची नागरिकांसोबत मीटिंग घेण्यात आली व सध्या च्या विषयांवर जसे की लसीकरण सत्र, अशा सेविकांचे नियुक्ती याबाबत मुख्य चर्चा करण्यात आली. व गावकर्यांना सविस्तर माहिती देऊन उपस्थित त्यांची स्वाक्षरी घेऊन ठराव घेण्यात आला. तद्नंतर शब्दसुमानाने सर्व गावकर्याचे आभार मानले व अल्पोपहार देऊन कार्यक्रमाचा समारोप केला. विशेष सहकार्य - समस्त ग्रामस्थ ओगाई माता यांनी केले

No comments