फैजपूर येथे मिल्लत नगर उपासना कॉलनी भागात नवीन जलकुंभाची मागणी फैजपूर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- ...
फैजपूर येथे मिल्लत नगर उपासना कॉलनी भागात नवीन जलकुंभाची मागणी
फैजपूर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे या क्षणाची स्थिती पाहता येणार्या पाच ते दहा वर्षांत फैजपूर शहराला पाणीपुरवठा वेळेवर होणार की नाही वेळ सांगेल सध्या फैजपूर येथील पाणीपुरवठा वेळेवर होत नाही तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी शहरवासीयांना पाणी मिळत आहे फैजपूरच्या मिल्लत नगर व उपासना कॉलनी भागात शेवटच्या टोकाला पाणी पोहचत नाही दहा वर्षांनी स्थिती काय असेल याचा विचार करून फैजपूर शहरात मिल्लत नगर व उपासना कॉलनी भागात नवीन पिण्याचे पाण्याची टाकी बांधण्यात यावी अशी मागणी न्यु खिदमते मिल्लत फाउंडेशनचे अध्यक्ष मुदस्सर नज़र यांनी नगरपालिका प्रशासक तथा फैजपूरचे प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या कडे केली आहे कारण या भागातील सध्याची लोकसंख्या पाहता पाच लक्ष लिटर ची पाण्याची टाकी बांधण्यात यावी कृपया आपण या मागणीच्या सहानुभूतीपूर्वक विचार करणार असल्याची ग्वाही प्रांताधिकारी बबनराव काकडे साहेब यांनी दिली आहे यावेळी न्यु खिदमते मिल्लत फाउंडेशनचे इमरान खान, कामील खान आदी उपस्थित होते.

No comments