अध्यात्म विद्येच्या प्राप्ती करता तपोभूमीची गरज आवश्यक - गुरुवर्य भरत महाराज पाटील इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) पूर्वी...
अध्यात्म विद्येच्या प्राप्ती करता तपोभूमीची गरज आवश्यक - गुरुवर्य भरत महाराज पाटील
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धती अस्तित्वात होती . गुरुकुलात जाऊन तप करून अध्यात्म विद्या प्राप्त केली जात असे . भगवान श्रीकृष्णाने गुरु संदीपान ऋषी यांना मथुरेत किंवा गोकुळात न आणता स्वतः उज्जैन इथे जाऊन गुरुकुलात शिक्षण घेतले हा त्याचा सबळ पुरावा असल्याचे प्रतिपादन वारकरी शिबिराचे मार्गदर्शक भरत महाराज पाटील यांनी केले . सांगवी बुll येथील वारकरी शिबिर सांगता समारोपच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सांगवी बुद्रुक येथील ज्योती विद्यामंदिर या ठिकाणी सद्गुरू झेंडूजी महाराज बेळीकर परंपरेचे वारकरी वारकरी भजन प्रशिक्षण शिबिर पंधरा दिवस यशस्वीपणे राबविण्यात आले .शिबिर सांगता समारोपाच्या प्रसंगी सर्व शिबिरार्थींना प्रशस्तीपत्र व परंपरेचे स्मृतीचिन्ह तसेच डोंबिवली येथील रितेश महाराज चौधरी यांच्याकडून प्राप्त गणवेशाचे वाटप करण्यात आले .गुरुकुलामध्ये गुरूच्या साधनेची सकारात्मक स्पंदने असतात . या वलयात प्राप्त केलेली अध्यात्म विद्या जीवन काळात फळास येत असते . श्रीक्षेत्र कुंडलेश्वर बेळी या ठिकाणी सद्गुरु झेंडूजी महाराज यांनी ईश्वर सानिध्यात तपश्चर्या केल्याने तेथील भूमीला तपोभूमीचे स्वरूप प्राप्त झालेले आहे .त्यामुळे या परंपरेचे भविष्यकालीन शिबिर श्री क्षेत्र कुंडलेश्वर बेळी या ठिकाणी घेण्याचे परंपरेचे नियोजन आहे . असे भरत महाराज यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून सांगितले . यानंतर विद्यार्थ्यांचे मनोगत झाली.शिबिरातून स्वावलंबनाचे धडे मिळाल्याचे मनोगत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले . कुशल ऑफसेट भुसावल च्या मंगला पाटील यांचा याप्रसंगी उत्कृष्ट उद्योजिका पुरस्कार प्राप्त झाल्याने परंपरेच्या वतीने सन्मान करण्यात आला . त्यांचे सौजन्याने सर्व शिबिरार्थींना प्रशस्तीपत्र मोफत देण्यात आले .प्रकाश मंडळाचे चंद्रकांत चौधरी, भालचंद्र भंगाळे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . समारोपाच्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर माजी पंचायत समिती सदस्य शेखर पाटील , विजय पाटील, कमलाकर चौधरी , विकास धांडे ,सांगवी गावातील ज्येष्ठ टाळकरी चक्रधर बुवा ,कुंडलेश्वर संस्थांनचे सचिव नितीन भोळे यांची उपस्थिती होती . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक महाराज शेळगावकर यांनी केले . आभार पंकज भंगाळे यांनी मानले . सांगता कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हरीश अत्तरदे व त्यांचे सर्व सहकारी यांनी परिश्रम घेतले.

No comments