adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

माजी नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली सावदा विज वितरण विभागावर समस्याग्रस्त लोकांचा मोर्चा!

  माजी नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली सावदा विज वितरण विभागावर समस्याग्रस्त लोकांचा मोर्चा!  रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- हेमकांत गा...

 माजी नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली सावदा विज वितरण विभागावर समस्याग्रस्त लोकांचा मोर्चा! 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सावदा :- येथील गौसियानगर, मदीनानगर,जिलानी नगर, मोहम्मदीया नगर,या भागातील कमी शमतेची विज डीपी मुळे पाणी टंचाई निर्माण होत असल्याने समस्याग्रस्त  नागरिकांनी माजी नगरसेवक  फिरोज खान यांच्या नेतृत्वाखाली दि.२८ एप्रिल रोजी स्थानिक विज वितरण कार्यालयात समस्या सुटावी या हेतूने मोर्चा नेला होता.तरी यावेळी कार्यकारी अभियंता व मुख्य अभियंता आणि अभियंता यांच्याशी या भागातील लोकांच्या समस्येवर सविस्तर चर्चा केल्यानंतर या बाबतीत आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केल्यानंतर या भागातील रहिवाशांची समस्यांची जाण ठेवून लगेचच मुख्य अभियंता यांच्याशी तसेच जळगाव येथील मुख्य अभियंता यांच्याशी आ.चंद्रकांत पाटील यांनी चर्चा करून त्वरित या भागात त्वरित २०० के.व्ही.ची डीपी बसवरण्याचे आदेश दिले.तरी येत्या सोमवार पर्यंत डीपी बसवण्यात येईल असे नागरीकां ना आश्वासन दिले.

यानंतर विज वितरण विभागाने विलंब न करता दि.३ एप्रिल रोजी सदर ठिकाणी २०० के.व्हीची डीपी बसवल्याने नागरिकांनी आ.चंद्रकांत पाटील सह माजी नगरसेवक फिरोज खान पठाण विज वितरणाचे अधिकाऱ्यांचे आभार मानले. 

समस्या न सुटल्यास हा विषय आमदारांना भेटून सांगणारच

सदरील रहीवासी भागांसाठी फक्त १०० के.व्ही.ची विज डिपी लावण्यात आली होती.तरी या डीपीवर २ कुपनलिकेचे देखील भार होते.यामुळे ही डिपी दोनदा जाळल्याने पुन्हा हेच प्रकार घडू नये,म्हणून या कुपनलिकांचे कनेक्शन विज वितरण कडून खंडित करण्यात आला होता.यामुळे सदरील भागांचा ठप्प झालेला पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत होणेकामी महिला अन्याय अत्याचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य चे पदाधिकारी फरीद शेख व युसूफ शाह यांनी दि.२६ एप्रिल रोजी सकाळी विज वितरण विभागात जाऊन चर्चा केली असता लाईमन यांनी खंडित कनेकशनाची जोडणी केली. तसेच यासोबत सदर ठिकाणी २०० के.व्ही.ची डिपी लवकर न दिल्यास हा प्रकार आम्ही थेट आमदार चंद्रकांत पाटील यांना भेटून सांगणारच असे बोलतच एका आठवड्यात डिपी बसवली जाईल असे आश्वासन त्यावेळी विज वितरणाचे संबंधितांनी दिले होते.

सध्या डीपी बसूनही कुपनलिका पासून हाकेच्या अंतरावरील जीलानी नगरात पाणी टंचाई का?याबाबत महीला अन्याय अत्याचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य चे पदाधिकारी सोमवारी पालिकेचे मुख्याधिकारी यांना सदर समस्यांचे निवारण करणेकामी भेट घेणार आहे.

No comments