डॉ.उज्जैनकर यांनी घेतले 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद यांचे दर्शन इदू पिंजारी फैजपूर - (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शिवचरण उज्जैन...
डॉ.उज्जैनकर यांनी घेतले 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद यांचे दर्शन
इदू पिंजारी फैजपूर -
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगावचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी नुकतेच नाशिक, त्रंबकेश्वर येथील उज्जैनकर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी श्रीराम शक्तीपीठ त्रंबकेश्वरचे प्रमुख महंत १००८ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांच्या बेजे, त्रंबकेश्वर या ठिकाणी जाऊन डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी स्वामींचे दर्शन घेतले याप्रसंगी डॉ. उज्जैनकर यांनी स्वामी सोमेश्वरानंद यांचे शाल, श्रीफळ आदिशक्ती मुक्ताईचा फोटो व हरीपाठाची पुस्तिका भेट देऊन सत्कार केला तर स्वामींनी डॉ. उज्जैनकर यांना त्यांनी लिहिलेला गुरुचरित्र हा ग्रंथ सप्रेम भेट दिला याप्रसंगी त्यांनी डॉ.उज्जैनकर यांना फाउंडेशनच्या उत्कृष्ट कार्याचे पत्र सुद्धा दिले. प्रसंगी त्रंबकेश्वर येथे डिसेंबर मध्ये होऊ घातलेले चौथे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलनाविषयी चर्चा करण्यात आली.याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप गोसावी नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रा. डॉ. प्रशांत रणसूरे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष विजय इटणारे नाशिक जिल्हा सल्लागार श्याम पाटणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, त्रंबकेश्वर येथे नेक कोऑर्डिनेटर प्रा. शरद कांबळे यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी डॉ. शिवचरण उज्जैनकर यांचा शाल देऊन सत्कार केला प्रसंगी. डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी सुद्धा आळंदी संमेलनाचा विशेषांक व हरी पाठाची पुस्तिका भेट देऊन प्रा. शरद कांबळे यांचा सत्कार केला. याप्रसंगी उज्जैनकर फाउंडेशनचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप गोसावी फाउंडेशनचे नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रा. डॉ. प्रशांत रणसुरे उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ . शिवचरण उज्जैनकर यांनी भगवान त्रंबकेश्वराचे दर्शन, संत निवृत्तीनाथ समाधी दर्शन, संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज मंदिर दर्शन ,राधाकृष्ण मंदिर दर्शन, तीर्थराज कुशावर्त या ठिकाणी दर्शन घेतले.

No comments