चोपडा तालुक्यातील 10वी12वी त प्रथम आलेल्या 180विध्यार्थी विद्यार्थीनीचा व त्यांच्या मुख्याध्यापकांचा सन्मान सोहळा चोपडा प्रतिनिधी (संपादक -...
चोपडा तालुक्यातील 10वी12वी त प्रथम आलेल्या 180विध्यार्थी विद्यार्थीनीचा व त्यांच्या मुख्याध्यापकांचा सन्मान सोहळा
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सुनिल पाटील (वाळकी )चोपडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित.. चोपडा तालुक्यातील 10वी12वी त प्रथम आलेल्या 180विध्यार्थी विद्यार्थीनीचा व त्यांच्या मुख्याध्यापकांचा सन्मान सोहळा काल नाट्यगृहात पार पडला. तालुक्यात प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.त्यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीश अण्णा पाटील, आमदार अनिल दादा पाटील, माजी आमदार कैलासबापू पाटील, माजी आमदार दिलीप तात्या सोनवणे, जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, प्रदेश सरचिटणीस रविंद्र नानाजी पाटील, कार्याध्यक्ष योगेश देसले, डाँ. पि एस पाटील, तालुकाध्यक्ष बाळासाहेब विजय पाटील,जेष्ठ नेते नारायण दादा पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सौ सोनाली ताई पाटील, उपजिल्हाध्यक्ष परेश भाऊ देशमुख, शहराध्यक्ष गिरीश भाऊ देशमुख, निलेश भाऊ पाटील, महिला शहर अध्यक्ष मायाताई महाजन, सविता ताई पाटील, सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष मिलिंद सोनवणे, रविंद्र भाऊ चौधरी, सोशल मीडिया अध्यक्ष वलय पाटील, यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
तालुक्यात प्रथमच गुणवंत विद्यार्थी व मुख्याध्यापक यांचा सन्मान सोहळा घेण्यात आल्याने उत्स्फूर्तपणे पालक विद्यार्थी व शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते. अतिशय आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाने शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मान्यवरांच्या चेहऱ्यावर आनंद व्यक्त होतांना दिसत होता

No comments