adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सर्वसामान्यांची लालपरीचा प्रवाशांच्या हस्ते ओटी भरून आगळावेगळा वाढदिवस साजरा चोपडा आगारात ७७ वा वर्धापन दिन साजरा

  सर्वसामान्यांची लालपरीचा प्रवाशांच्या हस्ते ओटी भरून आगळावेगळा वाढदिवस साजरा चोपडा आगारात ७७ वा वर्धापन दिन साजरा  चोपडा ( प्रतिनिधी)  (सं...

 सर्वसामान्यांची लालपरीचा प्रवाशांच्या हस्ते ओटी भरून आगळावेगळा वाढदिवस साजरा

चोपडा आगारात ७७ वा वर्धापन दिन साजरा 


चोपडा ( प्रतिनिधी) 

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

राज्य परिवहन महामंडळा च्या चोपडा आगारात एस टीचा ७७ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रम राबवुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार प्रमुख महेंद्र पाटील होते तर कार्यक्रमासाठी प्रवाशी बांधव व कर्मचारी बांधवाच्या उपस्थितीत प्रवाशी बांधवाच्या हस्ते सपत्नीक सजवलेली एस टी चे ओटी भरून औक्षण करून आगार प्रमुख महेंद्र पाटील व महीला प्रवाशी भगीनींच्या हस्ते केक कापुन वाढदिवस ( वर्धापन दिन)साजरा करण्यात आला. तसेच प्रवाशांचे देखील यावेळेस गुलाब पुष्प व पेढे देवुन सत्कार करून चोपडा आगारात आगळावेगळा पध्दतीने एस टी चा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.७७ वा वर्धापन दिनानिमित्त संपुर्ण आगार परीसर स्वच्छ व सुंदर करून रांगोळी काढुनी फुलमाळा व तोरणाने संपुर्ण आगाराची सजावट करण्यात आली होती.यावेळी नितीन सोनवणे, सिध्दार्थ चंदनकर,परेश बोरसे, ईश्वर चौधरी,सागर सावंत, नरेंद्र जोशी,पंडीत बाविस्कर,शाम धामोळे, भगवान नायदे,मुरलीधर बाविस्कर,कलिम शेख, प्रसन्न पाटील, सचिन कदम, रिजवान सैय्यद,विजय सोनवणे , धनंजय पाटील,साई उपहारगृहाचे संचालक जयदिप पाटील,राजश्री परदेशी,रिना पाटील, वृषाली बैसाणे,निर्मला बाविस्कर,मिनल बाविस्कर, सह कर्मचारी व प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments