adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नेवासाच्या धरतीवर श्रीरामपूर शहरातील विस्थापितांना तात्काळ पाच फुटाची जागा द्यावी, अन्यथा उद्रेक - सुभाष दादा त्रिभुवन

  विस्थापित दुकानदार कुठवर वाट पाहणार ? तात्काळ पुनर्वसन करा अन्यथा उद्रेक होणार !! नेवासाच्या धरतीवर श्रीरामपूर शहरातील विस्थापितांना तात्क...

 विस्थापित दुकानदार कुठवर वाट पाहणार ?

तात्काळ पुनर्वसन करा अन्यथा उद्रेक होणार !!

नेवासाच्या धरतीवर श्रीरामपूर शहरातील विस्थापितांना तात्काळ पाच फुटाची जागा द्यावी, अन्यथा उद्रेक - सुभाष दादा त्रिभुवन


श्रीरामपूर / प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली विस्थापित व्यापाऱ्यांना पोट भरण्यासाठी पाच फुटाची जागा मिळालीच पाहिजे, ठराविक व्यापाऱ्यांचे अतिक्रमण काढून बाकीच्यांना अभय का दिले गेले ? याचा जाब विचारण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिकेवर जवाब दो आंदोलन  करण्यात येऊन मुख्याधिकारी सोमनाथ घोलप यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. त्यावेळी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष  सुभाष दादा त्रिभुवन म्हणाले की, श्रीरामपूर प्रमाणेच नेवासामध्ये देखील अतिक्रमणे काढली गेली होती परंतु पुन्हा आहे त्या जागेवर पाच बाय पाच च्या छोट्या टपऱ्या करून आहे. त्या ठिकाणी सर्व विस्थापित व्यापाऱ्यांना नेवासा मध्ये जागा देण्यात येऊन व्यापाऱ्यांनी व्यवसाय सुरू केले आहे, त्याच धर्तीवर श्रीरामपूर शहरात देखील विस्थापित व्यापाऱ्यांना देखील आपल्या व्यवसायासाठी पाच बाय पाच फूटाची जागा देऊन त्याचे पुनर्वसन करावे अन्यथा श्रीरामपूर मध्ये मोठा उद्रेक होईल असा इशारा सुभाष दादा त्रिभुवन यांनी दिला आहे.

याप्रसंगी मर्चंड असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये, जितेंद्र छाजेड, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे आदींनी मनोगत व्यक्त केले. 

यावेळी तेजस गायकवाड, तौफिक शेख, बाळासाहेब बागुल, रईस शेख, रवी चव्हाण, एजाज पठाण, उत्तम चित्ते, भाऊसाहेब राऊत, जुबेर कुरेशी, बंडू वाघमारे, ओम नागरे, इंदर सेठी, सुनील दळवी, प्रकाश मुळे, असलम शेख, भारती वाणी, हाजी मजीदभाई मेमन, शेख शरीफ, रवींद्र कोरडे, राजेंद्र तरटे, जया तरटे, जावेद सय्यद, विजय अस्वले, विजय चौतमल, संजय शेलार, गौरव बिडवे, अशोक लोणकर, बापू सोनवणे, सुरेश ठाकरे, गौस तांबोळी, सुरेश बारस्कर, पोपट वाकचौरे, गुलाब गायकवाड, मनोज सहानी, सुमन थोरात, ज्योत्स्ना नरवडे, जावेद अत्तार, संजय खर्डे, अवंतिका देवकाते, संतोष छाजेड, अझहर अत्तार, सरदार अत्तार, सुलतान अत्तार, मुनीर शेख, सागर बोलके,ताहीर बागवान, विकी चव्हाण, गणेश पवार, सतीश पवार, राजू पवार, किशोर कंत्रोड, विकी कंत्रोड,निलेश मोरगे, कल्पना नरोडे, निजाम शेख, सवेरा सय्यद, मनोज गेलानी, हरी क्षीरसागर, राहुल तरटे, रिंकू लुल्ला, आनंद देठे, अलीम मनियार, सचिन भगरे,अजित शिरसाट, श्रीकांत बाकले, अभिषेक कल्याणकर, पंकज गंगवाल, रवी जावरे, ललित कंत्रोड, वसीम बागवान, शाहिद बागवान, इरफान बागवान, तन्वीर बागवान, अतिक बागवान, ताहेर बागवान, हारुन बागवान, इकबाल बागवान, सद्दाम बागवान, शाहरुख बागवान, योगेश घोरपडे, मनोज गायकवाड, ताया शिंदे, सोमनाथ पतंगे, किरण कतारे, नितीन उडे, नाना गव्हाणे, रामेश्वर काळे, भारत कांबळे, प्रेम शिंदे, प्रशांत कुलकर्णी, अशोक लोणकर, अक्षय गवळी, बंडू वाघमारे,रवींद्र गरेला, संतोष गरेला आदी विस्थापित दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वृत्त विशेष सहयोग

पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर 

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मिडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments