adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व सर्व खाजगी अनुदानित विनाअनुदानित शाळा प्रवेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करणार

  यावल तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व सर्व खाजगी अनुदानित विनाअनुदानित शाळा प्रवेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करणार यावल तालुका प्रतिनिधी (संपा...

 यावल तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व सर्व खाजगी अनुदानित विनाअनुदानित शाळा प्रवेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करणार


यावल तालुका प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

      जिल्हा परिषद शाळांचा विद्यार्थी पट वाढावा, जिल्हा परिषद शाळांचे महत्व जनतेला समजावे, जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी लाभाच्या सर्व योजनांची माहिती जनतेला व्हावी, जिल्हा परिषद शाळेतील मोफत व सक्तीच्या शिक्षणाचे महत्त्व गावकऱ्यांना पटावे   यासाठी यावल तालुक्यातील सर्व शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे, 

याची जय्यत तयारी यावल तालुक्यातील सर्व शाळांनी केलेली आहे. शाळा प्रवेशोत्सवात  शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिलीतील सर्व दाखलपात्र मुलांचे बैलगाडी,ट्रॅक्टर,घोडा गाडी व इतर पारंपारिक वाहनांवर सकाळीच मिरवणूक /प्रभात फेरी काढून शाळेत पोहोचल्यावर सर्व नवागत बालकांचे माननीय खासदार मॅडम माननीय आमदार साहेब व इतर सर्व पदाधिकारी तसेच जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय सर्व अधिकारी यांच्या तर्फे गुलाब पुष्प देऊन  स्वागत केले जाणार आहे, सर्व शाळांच्या दर्शनी भागात / प्रवेशद्वारा जवळ सन्माननीय पदाधिकारी व अधिकारी यांच्या स्वागतासाठी बॅनर लावले जाणार आहे, 

प्रवेशद्वारा जवळ रांगोळी टाकून पानाफुलांनी सजावट केली जाणार आहे. त्यानंतर सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप तसेच मोफत गणवेश व बूट आणि मोजे यांचे वाटप केले जाणार आहे. शालेय पोषण आहारासोबत गोड अन्नपदार्थ सुद्धा देण्यात येणार आहे, त्यानंतर सन्माननीय पदाधिकारी व अधिकारी यांचे सर्व मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे. यावल तालुका शिक्षण विभागामार्फत तालुक्यातील सर्व शाळांनी पालकांना आपल्या पाल्यांना उद्या शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत उपस्थित राहण्याबाबत माननीय  मुख्यमंत्री महोदय, मान.उपमुख्यमंत्री महोदय, मान.शिक्षण मंत्री महोदय, माननीय शिक्षण सचिव महोदय शिक्षण संचालक महोदय,माननीय जिल्हाधिकारी महोदय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदया यांचे आवाहन पत्र देण्यात आलेले आहे. तरी शिक्षण प्रवेश उत्सवासाठी तालुक्यातील सर्व सन्माननीय  पदाधिकारी अधिकारी वर्ग, सर्व पंचायत समिती विभाग प्रमुख, गावातील सर्व शिक्षण प्रेमी नागरिक, सर्व पालक व विद्यार्थ्यांनी सकाळी आठ वाजता शाळेत उपस्थित राहून आमचे विद्यार्थी शिक्षक व पालकांचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन पंचायत समिती यावल शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी  विश्वनाथ धनके यांनी केलेले आहे.

No comments