adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ब्रेकिंग..जिल्ह्यात महाराष्ट्रातील बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड तब्बल 70 लाखांचा मुद्देमाल जप्त..जुना भिडू पुन्हा ताब्यात

  ब्रेकिंग..जिल्ह्यात महाराष्ट्रातील बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड तब्बल 70 लाखांचा मुद्देमाल जप्त..जुना भिडू पुन्हा ताब्यात  सचिन मोकळं अहिल...

 ब्रेकिंग..जिल्ह्यात महाराष्ट्रातील बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड तब्बल 70 लाखांचा मुद्देमाल जप्त..जुना भिडू पुन्हा ताब्यात 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि२९):- राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय माहिती मिळाली की तीन अज्ञात इसम हे काळ्या रंगाची होंडा शाईन मोटरसायकल घेऊन अहिल्यानगर कडून राहुरी कडे भारतीय चलनाच्या नकली नोटा कब्जात बाळगून येत आहे. पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी लागलीच पोलीस पथकाला सूचना करून राहुरी शहरात नगर मनमाड रोडवरील संत गाडगेबाबा विद्यालयासमोर सापळा लावून तीन संशयित इसम पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार राहणार सोलापूर राजेंद्र कोंडीबा चौगुले राहणार कर्जत जिल्हा अहिल्यानगर तात्या विश्वनाथ हजारे तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर यांना ताब्यात घेऊन त्यांची अंग झळती घेतल्या असता त्यांच्या अंग झळतील मोबाईल व भारतीय चलनाच्या हुबेहूब दिसणाऱ्या मिळून आल्या, पोलिसांनी लगेच ॲक्सिस बँक मॅनेजर कैलास वाणी यांना बोलावून सदर नोटा तपासले असता त्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींना अधिक विचारपूस केली असता आरोपींनी शितल नगर टेंभुर्णी येथे समाधान गुरव यांच्या इमारतीत भाड्याने घर घेतलेले असून तेथे मशीन प्रिंटर कटिंग करण्याची मशीन नोटा बनवण्याचा कागद नोटा मोजण्याचे मशीन लॅमिनेशन मशीन कंट्रोल युनिटवर नोटा बनवत असल्याचे सांगितले. पोलिसांनी तब्बल 70 लाख 73 हजार 920 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर आरोपीं विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग बसवराज शिवपुजे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार सुरज गायकवाड राहुल यादव विजय नवले संदीप ठाणगे सतीश कुऱ्हाडे अंकुश भोसले प्रमोद ढाकणे , गणेश लिपने नदीम शेख  यांनी केले असून  सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव पोलीस अंमलदार साळवे शिंदे पाखरे  यांनी केली आहे.

No comments