भुसावळ फैजपूर रस्त्यावर पाडळसे जवळ बुलेट एसटी बसचा अपघात; एक ठार दोन गंभीर जखमी इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) भुसावळ फैज...
भुसावळ फैजपूर रस्त्यावर पाडळसे जवळ बुलेट एसटी बसचा अपघात; एक ठार दोन गंभीर जखमी
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भुसावळ फैजपुर रस्त्यावर पाडळसे गावाजवळ बुलेट आणि एसटी बसचा अपघात झालेला आहे यामध्ये ३० वर्षीय तरुण ठार झालेला आहे.
हा अपघात रविवार दि.२९ जून सायंकाळी घडला असून याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यास जून २०२५ रोजी रात्री ८:३० गुन्हा नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते तर जखमी आणि मयत यांचा मृतदेह तातडीने भुसावळ येथे ट्रामा केअर सेंटर नेण्यात आला तर जखमींना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घालवण्यात आले आहे. पाडळसे या गावाजवळून मार्गस्थ होणाऱ्या भुसावळ फैजपूर रस्त्यावर बुलेट क्रमांक MH 19 EF 7704 द्वारे मयूर श्रीराम गवळी वय 30 राहणार शिवाजीनगर जळगाव जयेश सुधाकर पाटील वय 29 चिरायू मनोज गोहर वय 29 हे तिघे जात होते दरम्यान एसटी बस क्रमांक MH 14 MH 1083 आणि बुलेट चा अपघात घडला यामध्ये मयूर गवळी हा जागीच ठार झाला तर दोघे जखमी झाले मयताचा मृतदेह आणि जखमी यांना तातडीने ट्रामा सेंटर भुसावळ ला हलवण्यात आले दोघा गंभीर जखमी झालेल्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच फैजपूरचे पोलीस सहाय्यक निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी पोलिसांच्या पथकाला घटनास्थळी पाठविले एसटी बस आणि बुलेट चा पंचनामा करून फैजपूर पोलिसांनी ताब्यात घेतली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
No comments