जळगाव जिल्ह्याच्या वैशिष्ट्यपूर्ण कृषी परंपरेचे प्रतीक, सन्मानचिन्ह मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांना भेट धरणगाव येथे महाराष्ट्राचे मुख्यमं...
जळगाव जिल्ह्याच्या वैशिष्ट्यपूर्ण कृषी परंपरेचे प्रतीक, सन्मानचिन्ह मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांना भेट
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र राज्याचे यशस्वी, दूरदृष्टीसंपन्न आणि विकासाभिमुख नेतृत्व करणारे 'विकासपुरुष' मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब आज जळगाव जिल्ह्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यासाठी आले असता त्यांचे स्वागत केले.
आदरणीय देवेंद्रभाऊ आणि आदरणीय गिरीशभाऊ यांच्या माध्यमातून 'बनाना बेल्ट'च्या सर्वांगीण विकासाला दिशा देणाऱ्या 'ताप्ती बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या महाराष्ट्र व मध्य प्रदेश सरकार दरम्यानच्या ऐतिहासिक कराराला मान्यता देण्यात आली .या प्रकल्पासाठी जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.गुलाबराव पाटील,केंद्रीय युवक आणि क्रिडा राज्यमंत्री खासदार श्रीमती रक्षाताई खडसे,वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.श्री. संजय भाऊ सावकारे यांचे सहकार्य लाभले. या दूरदर्शी निर्णयाबद्दल जिल्ह्याच्या वैशिष्ट्यपूर्ण कृषी परंपरेचे प्रतीक असलेल्या 'केळी'चे सन्मानचिन्ह त्यांना भेट स्वरूप दिले.
यावेळी रावेर यावल मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अमोल जावळे राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.श्री.संजय भाऊ सावकारे, धुळे शहर आमदार मा.श्री.अनुपभैया अग्रवाल, मुक्ताईनगर आमदार मा.श्री.चंद्रकांतजी पाटील, अमळनेर आमदार मा.श्री.अनिल जी पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्ते मित्र उपस्थित होते.
No comments