Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चुंचाळे येथे घेण्यात आले कायदेविषयक जनजागृती शिबिर

  चुंचाळे येथे घेण्यात आले कायदेविषयक जनजागृती शिबिर  भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज दिनांक 20 जून रोजी यावल ताल...

 चुंचाळे येथे घेण्यात आले कायदेविषयक जनजागृती शिबिर 


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आज दिनांक 20 जून रोजी यावल तालुका विधी सेवा समितीच्या वतीने यावल तालुक्यातील चुंचाळे येथील श्री. समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये भारतीय संविधानात नमूद करण्यात आलेल्या नागरिकांच्या कर्तव्यांविषयी जनजागृती करण्यात आली. यावल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रथम वर्ग न्यायाधीश श्री.आर.एस.जगताप यांच्या आदेशानुसार तसेच मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 


भारतातील प्रत्येक नागरिकाला आपल्या राष्ट्रधर्माविषयी तसेच आपल्या राष्ट्रीय कर्तव्यांविषयी माहिती असणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते शशिकांत वारूळकर हे होते. विद्यार्थी जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये देश प्रेम निर्माण व्हावे. संविधानात नमूद असलेली उद्दिष्टे समता,न्याय,बंधुत्व आणि एकता विद्यार्थ्यांमध्ये रुजावीत या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमासाठी श्री. समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक सुधीर चौधरी सर तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक संजीव तडवी समांतर विधी सहाय्यक हेमंत फेगडे यांनी परिश्रम घेतले.

No comments