चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दित २० लाखाचे गोवंशचे मांस व चामडे पकडण्यात यश चोपड़ा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा -:- शहरा...
चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दित २० लाखाचे गोवंशचे मांस व चामडे पकडण्यात यश
चोपड़ा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा -:- शहरात शिरपुर बायपास रोडवर दुर्गेश पेट्रोल पंपा समोर उभी असलेली ट्रक क्रमांक RJ-११- GB- १०७१ ह्या नबरच्या गाडीतुन उग्र वास येत असल्याने काही लोकांनी पोलिसांच्या लक्षात आणून दिले यावरून पोलिसांनी ट्रक चालकाला हटकले असता.त्यात चामडे आहे असे सांगितले असता अधिक तपासणी केली असता चामडे व गोवंशचे मास मिळून आल्याने ट्रक चालक मोनू कुमार हरिसिंग जाट (वय २३) रा.गढ़ी जोहरी पचोखरा ता.टुडला जि.फिरोजाबाद उत्तरप्रदेश याला ताब्यात घेतले व त्यात २० लाखाचे मांस सापडले आहे.
तसेच १७/०६/२०२५ रोजी बीजापुर कनार्टक येथून कानपुर येथे घेऊन जात असल्याचे सांगितले पशुधन विकास अधिकारी चोपडा यांनापशुधन विकास अधिकारी डॉ. सायली गोसावी हया त्यांचे स्टॉपसह हजर झाल्या त्यांनी मालट्रक मध्ये मिळुन आलेले जनावरांचे कातडी / चामडयाची पहाणी करुन सदरचे कातडे हे गोवंश जातीचे गाय, बैल वळु याचे असल्याचे सांगुन फॉरेन्सिक तपासणी कामी त्यातुंन नमुने घेवुन पॅक करुन आंम्हा पोलीसांचे ताब्यात दिले.मुद्देमालाचे वर्णन खालील प्रमाणे. ७,००,०००/- रु.कि.चे मालट्रक क्र. RJ-११-GB-१०७१ हीचेत असलेले मालट्रक सह ३४७९० कि.ग्रॅ. वजनाचे होते ऐकुन २७ लाख रुपये किमतिचा मुद्देमाल जप्त करण्यात आले मालट्रक चालक व मालक यांचे विरुध्द भा.न्या.सं.कलम ३२५, सह,महाराष्ट्र प्राणीरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ (अ),५ (ब), सह ९, ५ (क),५(ड),सह ९ (अ),११,सह,महा.पो.अधि.क.११९ प्रमाणे.पो.हे.कॉ.हर्षल सुभाष पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद करण्यात आले सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांचे आदेशाने सहा.पो.निरी.एकनाथ भिसे हे करीत आहेत.
No comments