अवैध कत्तलखान्याची माहिती देण्यावरून व्यापाऱ्याचे अपहरण करून लुटण्याच्या गुन्हयातील मुख्य दोन आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई स...
अवैध कत्तलखान्याची माहिती देण्यावरून व्यापाऱ्याचे अपहरण करून लुटण्याच्या गुन्हयातील मुख्य दोन आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.४):- जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे अवैध कत्तलखान्याची माहिती देण्यावरून व्यापाऱ्याचे अपहरण करून लुटण्याच्या गुन्हयातील ०२ मुख्य आरोपी छत्रपती संभाजीनगर येथून जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.बातमीची हकिगत अशी की,दि.२९ मे २०२५ रोजी फिर्यादी श्री.भारत देविदास निफारे (वय ३९ धंदा - व्यापार, रा.नाथनगर,पाथर्डी, जि.अहिल्यानगर) हे अहिल्यानगर येथून पाथर्डीकडे जात असताना त्यांचे मित्राने त्यांना सांगीतले की,तिसगाव येथे कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे येत आहेत.त्यामुळे फिर्यादी हे तिसगाव येथे थांबले असताना, गुन्हयांतील आरोपीतांनी फिर्यादीस उचलून रविवार पेठ, तिसगाव येथे नेऊन मारहाण करून गळयातील सोन्याची चैन काढुन घेऊन जीवे मारण्याची धमकी दिली.याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुरनं 22593/2025 बीएनएस कलम 140 (3), 119 (1), 115 (2), 351 (2),127, 189(2), 191(2),190 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.सदरचा गुन्हा दाखल झालेपासुन आरोपी हे फरार झाले असल्याने,तसेच घडलेल्या गुन्हयांची प्राथमिक माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना गुन्ह्याचा समांतर तपास करुन, गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेणेबाबत आदेश दिले.त्यानुषंगाने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार सुरेश माळी,फुरकान शेख,सागर ससाणे,विशाल तनपुरे,किशोर शिरसाठ,प्रशांत राठोड व भगवान धुळे अशांचे पथक नेमुन गुन्हयातील आरोपीचा शोध घेणेबाबत सुचना देऊन पथकास रवाना केले.दि.०४ जून २०२५ रोजी पथक गुन्हयातील आरोपीचा गोपनीय माहिती व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना गुन्हयातील आरोपी शाकीर कुरेशी व इरफान कुरेशी,रा.तिसगाव, ता.पाथर्डी हे छत्रपती संभाजीनगर येथे असलेबाबत माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून पथकाने छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन सिल्लेखान परिसरात आरोपीचा शोध घेऊन १)शाकीर सलीम कुरेशी, वय २४ व २) इरफान फैजु कुरेशी, वय ३३, दोन्ही रा.तिसगाव, ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीतांना नमूद गुन्हयाचे तपासकामी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक,श्री.सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments