दिव्यांग बांधवांना स्वावलंबनासाठी प्रेरणा देणारे मार्गदर्शन सत्र यावल येथे यशस्वी भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...
दिव्यांग बांधवांना स्वावलंबनासाठी प्रेरणा देणारे मार्गदर्शन सत्र यावल येथे यशस्वी
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
“शासनाच्या योजना मिळाल्या तर दिव्यांग देखील यशस्वी उद्योजक बनू शकतात” यावल (ता. 4 जून 2025) – दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे आणि त्यांना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने यावल येथे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात आज सकाळी 11:30 वा. जिल्हा उद्योग निरीक्षक ललित गोविंदा तायडे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन व संवाद सत्र पार पडले. या कार्यक्रमात दिव्यांग बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना (PMEGP), मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP), दिव्यांगांसाठी विशेष कर्ज योजना, तसेच उद्योग संचालनालय मार्फत मिळणाऱ्या सवलती, यांची सविस्तर माहिती देण्यात आली.
ललित तायडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “शासकीय योजना प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. विशेषतः दिव्यांग व्यक्तींसाठी शासनाकडे भरपूर योजना आहेत, पण माहितीअभावी त्या पोहोचत नाहीत. आपण त्यांना फक्त आधार नाही तर दिशा देण्यासाठी येथे आलो आहोत.”
कार्यक्रमात प्रहार दिव्यांग क्रांति संघटना संघटनेचे जिल्हा सल्लागार शरद बारजीभे साहेब,प्रहार दिव्यांग क्रांति संघटना यावल तालुका अध्यक्ष हरिभाऊ पाटील,बोदवड तालुका अध्यक्ष श्री रमेश दादा लोहार भुसावळ ता अध्यक्ष श्री दिलीपभाऊ पाटील बोदवड महिला ता अध्यक्ष छाया ताई तायडे चाळीसगांव महिला आघाडी तालुका अध्यक्ष रत्नाताई पाटील,वासुदेव बडगुजर ललित पाटील,दिलीप आमोदेकर, अरूण ठाकुर,उत्तम कानडे, उन्मेश अडकमोल डाॅ पारसमल बोदवड ललिताताई मराठे वारूळेताई मायाताई गवळी प्रल्हाद बेदरे अशोक तायडे साहेब योगेश महाराज बोदवड मिना देशमुख यावल जिजाबाई कोळी विमल सरोदे यावल शिल्पा देशमुख थोरगव्हाण मनिषा बाविस्कर थोरगव्हाण महेश जावळे सावदा तसेच तालुक्यातील विविध गावांमधून आलेले दिव्यांग बांधव आणि भगिनी उपस्थित होते. या संवाद सत्रात दिव्यांग बांधवांनी स्वतःच्या व्यवसायाच्या कल्पना, येणाऱ्या अडचणी, तसेच शासकीय कार्यालयांमधील प्रक्रियेबद्दलचे अनुभव खुलेपणाने मांडले. काहींनी म्हटले की कर्ज मिळवताना पुरावे सादर करणे, हमीदार मिळवणे, तसेच प्रशिक्षण सत्रांमध्ये जाणे या बाबतीत अडचणी येतात.
श्री. तायडे यांनी सांगितले की, उद्योग संचालनालयाकडून दिव्यांगांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आणि सुलभ कर्ज सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक ती मदत तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. कार्यक्रमाचे समारोप करताना शरद बारजीभे यांनी सांगितले, “दिव्यांगांना मदत ही केवळ सहानुभूतीने नव्हे, तर समानतेच्या हक्काने मिळाली पाहिजे. असे उपक्रमच खऱ्या अर्थाने दिव्यांगांना सक्षम करतात.”
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रहार जनशक्ती संघटना, यावल शेतकरी खरेदी विक्री संघ यावल, आणि स्थानीय दिव्यांग संघटनांचे योगदान मोलाचे ठरले व ५० ते ६० कार्यकत्यांनी प्रहार दिव्यांग क्रांति संघटना मध्ये प्रवेश केला व त्यांना जिल्हा सल्लागार श्री शरद बारजिभे साहेब व श्री हरी भाऊ पाटील तालुका अध्यक्ष यांनी नियुक्ति पत्र दिले सुत्र संचालन प्रहार दिव्यांग क्रांति संघटना यावल तालुका अध्यक्ष श्री हरी भाऊ पाटील यांनी केले
🚩श्री हरी भाऊ पाटील प्रहार दिव्यांग क्रांति संघटना यावल तालुका अध्यक्ष🚩🙏🙏🚩

No comments