adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांची पुरीगोसावी यांनी घेतली सदिंच्छा भेट..!!

 पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांची पुरीगोसावी यांनी घेतली सदिंच्छा भेट..!!   संभाजी पुरीगोसावी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी.  (संप...

 पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांची पुरीगोसावी यांनी घेतली सदिंच्छा भेट..!!  


संभाजी पुरीगोसावी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पुणे महानगरपालिकेचे विद्यमान नूतन आयुक्त मा.नवल किशोर राम साहेबांची संभाजी पुरीगोसावी यांनी सदिंच्छा भेट घेवुन त्यांचे स्वागत करीत शुभेच्छा दिल्या..!! यावेळी आपण पुणे जिल्हाधिकारी म्हणून कोरोना काळात उत्कृंष्ट सेवा दिली असेही आवर्जून पुरीगोसावी यांनी आपल्या प्रतिक्रिया साहेबांना व्यक्त केल्या..!! कर्तव्यदक्ष (आयएएस अधिकारी) म्हणून तुमची ओळख..!! पुणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार नवल किशोर राम यांनी दिनांक 31/ 5/ 2025 रोजी सेवानिवृत्त आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडून स्वीकारला, महापालिकेत काम करण्याची उत्तम संधी मिळालेली आहे, तसेच सगळ्यांना बरोबर घेवुन काम करणार आहे, भारतीय प्रशासकीय सेवेतील 2008 च्या तुकडीतील नवल किशोर राम हे (आयएएस) अधिकारी आहेत. ते मूळचे बिहारमधील असून 2007 मध्ये भारतीय शासकीय सेवेत दाखल झाले होते, आयएएस बनल्यानंतर त्यांचे पहिली पोस्टिंग नांदेड मध्ये झाली होती, त्यानंतर यवतमाळ जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी त्यानंतर बीड आणि छत्रपती संभाजीनगर तर पुणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते, कोविड महामारीच्या काळात पुणे जिल्हाधिकारी म्हणून नवल किशोर राम हे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी  ठरले, त्यानंतर तिथून त्यांची पंतप्रधान कार्यालयामध्ये उपसचिव पदावर बदली झाली होती, त्यानंतर आता पुणे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून त्यांची नुकतीच नियुक्ती झाली असून त्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे, आज रोजी सकाळी सातारा जिल्ह्याचे संभाजी पुरी गोसावी यांनी पुणे महानगरपालिका कार्यालयातील त्यांच्या दालनात जयहिंद नमस्कार साहेब असे म्हणत... नूतन आयुक्तांची सदिंच्छा भेट घेतली, आयएएस अधिकारी नवल किशोर राम यांना कर्तव्यदक्ष आणि सर्वसामान्य प्रथम न्याय देणारे अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते

No comments