महानगरपालिकेतर्फे शहरात दर रविवारी डेंग्यूमुक्त अहिल्यानगर अभियान सुरू आरोग्य विभागाची पथके दर आठवड्याला १ हजार घरांना भेटी देऊन सर्वेक्षण...
महानगरपालिकेतर्फे शहरात दर रविवारी डेंग्यूमुक्त अहिल्यानगर अभियान सुरू
आरोग्य विभागाची पथके दर आठवड्याला १ हजार घरांना भेटी देऊन सर्वेक्षण करणार
नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस "कोरडा दिवस पाळावा" : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि१५):महानगरपालिकेच्या वतीने अहिल्यानगर शहर डेंग्यूमुक्त करण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत.त्याचाच भाग म्हणून नागरिकांच्या सहभागातून डेंगू मुक्त अहिल्यानगर अभियान दर रविवारी राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आरोग्य विभागाची पथके दर आठवड्याला 1000 घरांना भेटी देऊन सर्वेक्षण व उपायोजना करणार आहेत.
रविवार पासून या अभियानाला सुरुवात झाली आहे. डास आळींची उत्पत्ती रोखली जावी, यासाठी आठवड्यातून एक दिवस नागरिकांनी "कोरडा दिवस पाळावा" व या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.मागील वर्षे ही महानगरपालिकेच्या वतीने डेंगू मुक्त शहर अभियान राबवले होते. यात नागरिक व विविध संघटनेचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. यावर्षी होणाऱ्या अभियानात आरोग्य विभागाचे १२ वैद्यकीय अधिकारी, १ साथरोग अधिकारी, १५ स्टाफ नर्स, ३५ एएनएम, ६ एमपीडब्ल्यू, १६ मलेरिया कर्मचारी, २५ आशा स्वयंसेविका असे ११० कर्मचारी अभियानाच्या माध्यमातून २० पथकांद्वारे १००० घरांतील ५००० लोकसंख्येचे सर्व्हेक्षण करणार आहेत. रविवार 15 जून पासून हे अभियान सुरू करण्यात आले आहे.डेंग्यू पासून सावध राहण्यासाठी, डेंग्यूची डास अळीची उत्पत्ती रोखण्यासाठी जनजागृती करणे, डास अळी नियंत्रण कार्यक्रम, पाणीसाठ्यांची तपासणी, पाणी साठवले जाणारे अथवा दूषित पाणी साठलेले कंटेनर शोधून रिकामी करणे, पाण्यात अळीनाशक अॅबेट टाकणे, डास नाशक स्प्रेईंग करणे, डास अळी सापडलेल्या घरांवर स्टिकर लावणे, ताप सदृश्य रुग्णांचे सर्व्हेक्षण, मलेरिया स्लाईड घेणे, कार्यक्षेत्रात आरोग्य शिक्षण देणे, डास उत्पत्ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, नागरिकांमध्ये जनजागृतीकरिता माहितीपत्रके वाटप करणे आदी कार्यक्रम व उपक्रम या अभियानातून होणार आहेत. नागरिकांनीही या अभियानात सहभागी व्हावे. एक दिवस कोरडा दिवस पाळावा व स्वतःच्या घराची तपासणी करून साचाललले पाणी काढून टाकावे, असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी म्हटले आहे.


No comments