गोमांस विक्री करणाऱ्या आरोपीस कोतवाली पोलिसांनी केले गजाआड,कोतवाली पोलिसांनी केले हे आवाहन सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक-:- हेमकांत गायकव...
गोमांस विक्री करणाऱ्या आरोपीस कोतवाली पोलिसांनी केले गजाआड,कोतवाली पोलिसांनी केले हे आवाहन
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि१५):- कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना दि.१५ जून २०२५ रोजी सायंकाळच्या सुमारास गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की,शहरातील झेंडीगेट येथील बाबा बंगाली शासकिय शौचालयाचे बाजुला घरामध्ये गोवंशिय जनावरांच्या मांसाची विक्री केली जात आहे अशी माहिती मिळाल्यावरुन पोलीस निरीक्षक दराडे यांनी गुन्हे शोधपथकाला याची माहिती देऊन कारवाई करण्यास सांगितले.मपोहेकॉ/रोहिनी दरंदले यांनी गुन्हे शोध पथकासह शहरातील झेंडीगेट येथील बाबा बंगाली शासकिय शौचालयाचे बाजुला घरामध्ये जावुन खात्री केली असता सदर ठिकाणी मांस विक्री करणारे इसमांच्या समोर लहान मोठे आकाराचे मांसाचे तुकडे लटकवलेले दिसले पथकाची खात्री होताच तेथे छापा टाकुन सदर ठिकाणी इसमास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्यानी त्याचे नाव सरफराज कदीर कुरेशी (वय.३२ वर्षे रा. बाबा बंगाली शासकिय शौचालयाचे जवळ, अहिल्यानगर) असे असल्याचे सांगीतले.त्यावेळी अरोपी याचे घराची झडती घेतली असता सदर ठिकाणी १०,०००/-रु किंमतीचे लहान मोठे आकाराचे गोवंशीय जनावरांचे मांसाचे तुकडे सुमारे ५० किलो वजनाचे गोमांस,एक लोखंडी सत्तुर व एक वजन काटा असा एकुन १०,२००/- रु किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन त्याचे विरुध्द कोतवाली पोस्टे १) गुरनं ५५९/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २७१ सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सन १९९५ चे सुधारित सन २०१५ चे कलम ५ (क) ९ (अ) प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आला आलेला असुन आरोपीत यास ताब्यात घेण्यात आलेले आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा मपोहेकॉ/ रोहिनी दरंदले या करीत आहेत.तरी याव्दारे कोतवाली पोलीसांकडुन जनतेस अवाहन करण्यात येते की, आपणा गोमांस विक्री होत आहे अथवा वाहतुक होत आहे याबात माहीती मिळताच तात्काळ कोतवाली पोलीस ठाणेत कळविण्यात यावे. सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अमोल भारती, यांचे मार्गदर्शनाखाली पोनि / प्रताप दराडे, मपोहेकॉ.दरंदले, पोकॉ/दिपक रोहकले, पोकॉ/ तानाजी पवार, पोकॉ/दत्तात्रय कोतकर, पोकॉ/शिरीष तरटे, पोकॉ/सुरज कदम, पोकॉ/सचिन लोळगे, पोकॉ/राम हंडाळ, पोकॉ/गावडे, पोकॉ/कव्हळे यांच्या पथकाने केली आहे.

No comments