अडावद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरात ५७६ लाभार्थ्यांनी घेतला लाभ चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अडावद त...
अडावद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरात ५७६ लाभार्थ्यांनी घेतला लाभ
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अडावद ता. चोपडा येथे ७ क्षत्रिय माळी समाज मंगल कार्यालयात राज्य शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” अंतर्गत चोपडा तालुक्यातील अडावद मंडळातील ९ गावांसाठी एकत्रित महसूल व सर्वसमावेशक शासकीय सेवा शिबीराचे आयोजन करण्यात आले.उद्घाटन आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून विविध योजनेचे प्रमाणपत्रे व धनादेश प्रदान केले.
नागरिक सहभाग व लाभ- शिबिरात ७०० ते ८०० नागरिकांनी उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला.शासनाच्या विविध विभागांनी एकत्रितपणे सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच प्रशासनाची सुविधा सुलभतेने मिळाली.यावेळी अमळनेर उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे,उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा आण्णासाहेब घोलप,तहसीलदार,भाऊसाहेब थोरात,गटविकास अधिकारी चोपडा पंचायत समिती अनिल विसावे,निवासी नायब तहसीलदार योगेश पाटील,तालुका कृषी अधिकारी दिपक साळुंखे,प्रभारी सरपंच विजीता हरिश पाटील,माजी लोकनियुक्त सरपंच भावनाताई माळी,माजी सरपंच भारतीताई महाजन,वडगाव बु.चे माजी सरपंच नामदेव पाटील,जेष्ठ शिवसैनिक शेटे सर विकासो संचालक लोकेश काबरा,वर्डीचे माजी सरपंच रवींद्र पाटील मंगल इंगळे चंद्रशेखर साळूंखे सर प्रविण सोनवणे पिंप्री सरपंच वकील इंगळे,वटार सरपंच गोपाल ठाकरे,सुटकार सरपंच रवींद्र ठाकरे,मितावली सरपंच ज्ञानेश्वर इंगळे प्रमोद बाविस्कर,चांदसनी उपसरपंच नामदेव धनगर,सचिन महाजन,पी.आर.माळी,नंदु पाटील,हरिष पाटील,बापु कोळी,कृष्णा महाजन,जावेद खान,कालू भाऊ,आदी सह शिवसैनिक,ग्रामस्थ व सर्व तालुका स्तरीय अधिकारी,कर्मचारी व मंडळ स्तरावरील यंत्रणा उपस्थित होते

No comments