"एक हात मदतीचा चॅरिटेबल ट्रस्ट" संस्थे द्वारा पितृदिना निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न वसई विरार प्रतिनिधी :- मनिष...
"एक हात मदतीचा चॅरिटेबल ट्रस्ट" संस्थे द्वारा पितृदिना निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न
वसई विरार प्रतिनिधी :- मनिषा जाधव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
विरार (दि.१५) -:- जसे वडील आपल्या कुटुंबासाठी आधारस्तंभ असतात, तसेच हे लावलेले झाड भविष्यासाठी सावली व संरक्षण देईल. असा संदेश समाजाला देत विरार ची गावदेवी आई जीवदानी माता मंदीराच्या पायथ्याशी, पाचपायरी येथे "एक हात मदतीचा चॅरिटेबल ट्रस्ट" व जीवदानीदेवी संस्थान यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दि. १५/०६/२०२५ रोजी पितृदिनाचे औचित्य साधून १०० भारतीय रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. आई जीवदानी माता संस्थान चे अध्यक्ष श्री. प्रदीप तेंडुलकर यांच्या हस्ते प्रथम रोप लावून वृक्षारोपणाला सुरवात करण्यात आली.
"एक हात मदतीचा चॅरिटेबल ट्रस्ट " द्वारे जीवदानी माता संस्थान व वनखात्याच्या परवानगीने गत वर्षी जूनमधे सुद्धा स्वातंत्रवीर सावरक यांच्या १४१ व्या जयंती निम्मित १४१ रोपांची सलामी देण्यात आली होती.

No comments