पर्यावरणाच्या नावाखाली शेतकऱ्यांना युरिया ₹१३५०/- रुपयात विकण्याचा खत कंपन्याचा डाव.......एस बी नाना पाटील. चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- ह...
पर्यावरणाच्या नावाखाली शेतकऱ्यांना युरिया ₹१३५०/- रुपयात विकण्याचा खत कंपन्याचा डाव.......एस बी नाना पाटील.
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
_२०१०मध्ये जेव्हा न्यूट्रियंट बेस्ड सिस्टम (Nutrient based system (NBS)) युरिया व्यतिरिक्त इतर खतांना लागू केली त्यावेळेस देखील संसदेत सरकारचे शेतकऱ्यांप्रती प्रेम उतू आले व जागतिक बाजारपेठेतील खतांच्या कमी किमतीचा शेतकऱ्यांना फायदा व्हावा या साठी योजना लागू करणे कसे गरजेचे याचे फायदे सांगण्यात आले.प्रत्यक्षात गेल्या पंधरा वर्षात जगभर रासायनिक खतांची किंमत कमी होत होती भारतात मात्र अनुदाने घेऊन देखील तिप्पट वाढत होती?का?का कमी झाले नाहीत खतांचे दर?
जर आज NBS स्कीम मध्ये युरिया आला तर नायट्रोजन ची जी सबसिडी कंपन्यांना २०२५ आली ₹४३.०२ देत होती,त्यानुसार ४५किलोची युरिया चे थैली त २०.७ किलो नायट्रोजन असतो, म्हणजे आजच्या दराने त्यांना युरिया साठी सबसिडी मिळेल ₹९००.
खत कंपन्या आज त्यांच्या युरिया खताची विक्री किंमत दाखवत आहेत ₹२२००/- त्यातील ₹९००/- अनुदान वगळले तर घाऊक किंमत जाईल ₹१३००/-.
म्हणजे शेतकऱ्यांना एका युरिया थैली मागे ₹१०५०/- जास्त मोजावे लागतील.
प्रति एकरी साऱ्याच पिकांचा उत्पादन खर्च वाढेल ₹४०००/- ते ₹५०००/-....कसा जगेल शेतकरी.
जगभरातील २७ बंदी असलेले कीटकनाशके २०१५ पासून सर्हास भारतात विकली जात आहेत. शास्त्रज्ञ बंदी घालायला सांगतात,सुप्रीम कोर्ट विचारते का वारंवार समिती?त्यावर ना सरकार बोलत ना खत/कीटकनाशक कंपन्या?त्यानं पर्यावरणाची हानी होत नसेल तर फक्त युरिया किमतीवर का उतरतात?हा शेतकऱ्यांना लुटण्याचा डाव आहे.
लुटायला सोपा प्राणी शेतकरी,त्याची पोर संघटित नाहीत म्हणून भारतातील शेतकरी लवकरच भिकेला लागेल.शेतकऱ्यांची पोर मिडिया त आहेत ती थोडी फार मदत करतात तेवढाच एक दिलासा.
No comments