रोटरी क्लब चोपडा तर्फे सत्रसेन व विरवाडे केंद्रात आरोग्य तपासणी,स्तनदा व गरोदर मातांना प्रोटीन पावडर,डिलिव्हरी किट व इतर साहित्याचे वाटप च...
रोटरी क्लब चोपडा तर्फे सत्रसेन व विरवाडे केंद्रात आरोग्य तपासणी,स्तनदा व गरोदर मातांना प्रोटीन पावडर,डिलिव्हरी किट व इतर साहित्याचे वाटप
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा - येथील रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे तालुक्यातील विरवाडे व सत्रासेन प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गावांमधील स्तनदा व गरोदर मातांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली व आवश्यक त्या औषधांचे वाटप करण्यात आले.यावेळी स्तनदा मातांना लोहयुक्त गोळ्या,कॅल्शियम गोळ्या,प्रोटीन पावडर वाटप करण्यात आले तर गरोदर मातांची प्रसूती काळात योग्य काळजी घेतली जावी म्हणून डिलिव्हरी किट चे वाटप करण्यात आले.ग्रामीण व आदिवासी क्षेत्रात महिलांचे स्वतःच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष, काही वेळा उपलब्ध न होणाऱ्या सुविधा,औषधांचा तुटवडा या बाबी लक्षात घेऊन या प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रकल्पासाठी अवांता फाऊंडेशनचे मनोहर धिवरे यांचे सहकार्य लाभले.यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे.डॉ.ईश्वर सौंदाणकर,प्रकल्प प्रमुख रोटे.डॉ.नीता जयस्वाल,प्रवीण मिस्तरी,सहसचिव संजय बारी,कोषाध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह शिरीष पालीवाल,निखिल सोनवणे,अरुण सपकाळे,जगदीश महाजन,नानासाहेब भादले,सरपंच भादले मॅडम आणि किरण नाना तायडे हे उपस्थित होते.दोन्ही उपकेंद्रातील परिचारिका,आशा वर्कर व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

No comments