चोपडा शहरातील कत्तलीसाठी डांबुन ठेवलेले १५ गोवंश जातीचे जनावरांची सुटका चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दिनांक ०५/०६/२०२५ रो...
चोपडा शहरातील कत्तलीसाठी डांबुन ठेवलेले १५ गोवंश जातीचे जनावरांची सुटका
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दिनांक ०५/०६/२०२५ रोजी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक मधुकर साळवे यांना मिळालेल्या गोपनिय बातमीनुसार त्यानी पथक तयार करुन चोपडा शहरात बातमीप्रमाणे दुपारी १२/०० वा चे सुमारास बातमीचा ठिकाणाचा शोध घेवुन आरोपी शेख अकबर शेख महेबुव रा मोमीन अली चोपडा ता चोपड़ा याने चोपडा शहरातील के जी एन कॉलनी भागात तात्पुरत्या पत्र्याचे शेडमध्ये १५ गोवंश जातीचे जनावरे कत्तलीसाठी डांबून ठेवलेले दिसुन आले
सदर ठिकाणी छापा टाकुन १०,१०,०००/- (दहा लाख दहा हजार रुपये किमतीचे) जनावरे ताब्यात घेवून सदर जनावराबाबत कोणत्याही प्रकारचे विल्ले अगर खरेदी विक्रीचे पावत्या सादर न केल्याने सदर इसमांविरुध्द चोपडा शहर पो स्टे गुरन ३४५/२०२५ महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५८,५व प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई करण्यात आली आहे.सदरची गोवंश जातीचे १५ जनावरे पालन पोषणा करीता अमर संस्था संचलीत गोशाळा वेले ता चोपडा येथे जमा करण्यात आली आहेत.सदरची कामगीरी डॉ महेश्वर रेडी पोलीस अधिक्षक जळगाव,याचे मार्गदर्शनाखाली व अण्णासाहेब घोलप उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा,उपविभाग याचे सुचना प्रमाणे पोनि मधुकर साळवे,सहापोनि एकनाथ भिसे,सहाफौ दिपक विसावे,पोहेकॉ संतोष पारधी,पोहेकॉ ज्ञानेश्वर जवागे,पोना संदिप भोई,पोकॉ विनोद पाटील,पोकॉ निलेश वाघ,पोकॉ अमोल पवार,पोकॉ मदन पावरा,पोकॉ दिपक साळुखे अशांनी केली आहे.


No comments