adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विजयस्तंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र फैजपूर या ठिकाणी आज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न

  विजयस्तंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र फैजपूर या ठिकाणी आज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न  रावेर प्रतिनिधी  (आदित्य गजरे ) (...

 विजयस्तंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र फैजपूर या ठिकाणी आज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न 


रावेर प्रतिनिधी  (आदित्य गजरे )

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

  फैजपूर नगर परिषदेचे टॅक्सेशन अँड ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसर हेमंत ठाकरे सर यांनी विजयस्तंभ अकॅडमी मधील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती व विविध परीक्षांचा अभ्यास कसा करावा कोणते संदर्भ पुस्तके वापरावीत व अभ्यासाचे नियोजन कसे करावे त्या संदर्भात मार्गदर्शन केले सर्वप्रथम विजय स्तंभ अकॅडमी चे संचालक सहाय्यक प्राध्यापक आकाश तायडे सर यांनी हेमंत ठाकरे सरांचा सत्कार केला व नंतर विजयस्तंभ अकॅडमीचे कॉर्डिनेटर आकाश शिवाजी चौधरी यांनी समाजसेवक तसेच पत्रकारिता व ग्रामपंचायत सदस्य मोहमांडली जुम्मा तडवी यांचा सत्कार केला विजयस्तंभ अकॅडमी मध्ये विविध स्पर्धा परीक्षांचे योग्य ते मार्गदर्शन शिबिर तसेच सेमिनार तसेच विविध कार्यशाळा तसेच विविध उपक्रम नेहमी राबवले जातात


या कार्यक्रमांमध्ये विजयस्तंभ अकॅडमीचे सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वी पाडण्यासाठी मेहनत घेतली तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन  नितेश भारंबे यांनी केले तसेच अध्यक्ष भाषण सहाय्यक प्राध्यापक आकाश तायडे सर संचालक विजयस्तंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र फैजपूर यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्य व आपण घ्यावयाची मेहनत सोबतच स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या तीन गोष्टी आपल्याला सांगितल्या त्यामध्ये त्यांनी अभ्यासासाठी बसायला योग्य ती जागा व अभ्यासासाठी योग्य ते मार्गदर्शन व योग्य ते संदर्भ पुस्तके असे त्रिसूत्री स्पर्धा परीक्षा यशस्वी होण्यासाठी विविध मार्ग त्यांनी सांगितले तसेच विजयस्तंभ अकॅडमी मध्ये व अभ्यासिकेमध्ये गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माफक दरामध्ये सर्व स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केले जाते तसेच विजयस्तंभ अकॅडमी मध्ये आतापर्यंत शेकडो विद्यार्थी यशस्वी झालेल्या आपल्याला विविध क्षेत्रांमध्ये दिसून येतात तसेच जुम्मा तडवी यांनी समाजाप्रती विद्यार्थ्यांनी कशी जाणीव ठेवावी याबद्दल विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले

No comments