adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जळगांव माध्यमिक शिक्षक पतपेढी तर्फे मयत सभासद वारसाला अठरा लाख पंच्यात्तर हजार मदतीचा धनादेश प्रदान

  जळगांव माध्यमिक शिक्षक पतपेढी तर्फे मयत सभासद वारसाला अठरा लाख पंच्यात्तर हजार मदतीचा धनादेश प्रदान जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गा...

 जळगांव माध्यमिक शिक्षक पतपेढी तर्फे मयत सभासद वारसाला अठरा लाख पंच्यात्तर हजार मदतीचा धनादेश प्रदान


जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगांव (दि :२७) चोपडा जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढी मर्यादित जळगांव तर्फे सभासदांचा यावर्षी रुपये २५ लाखांचा वैयक्तिक अपघात विमा काढलेला होता.

या अपघात विमा योजनेंतर्गत पतपेढीचे सभासद कै.वाल्मिक मधुकर पाटील,शिपाई,सौ.एस.पी.पाटील माध्यमिक विद्यालय,आमडदे ता.भडगांव जिल्हा जळगांव यांचे दिनांक-०५/१२/२०२४ रोजी अपघातात दुदैवी अपघाती निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबाला अपघात विमा योजने अंतर्गत दि.न्यु.इंडिया एश्योरेंन्स कंपनी लि.कडून रुपये अठरा लाख पंच्यात्तर हजार चा धनादेश त्यांच्या पत्नी यशोदा वाल्मिक पाटील यांना अध्यक्ष एस.डी.भिरुड,मानद सचिव भगतसिंग पाटील,संचालक जगदिश पाटील,डिगंबर पाटील,रविंद्र रणदिवे,माजी मानद सचिव अजय देशमुख, राजेंद्र चव्हाण सर हिशोबनिस सुरेश पाटील,अधिक्षक सुनिल महाजन यांच्या उपस्थितीत अदा करण्यात आला.

No comments