adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अवैधरित्या राहणा-या तीन बांग्लादेशी नागरीकांना एमआयडीसी पोलिसांनी घेतले ताब्यात..बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड चा करत होते वापर

  अवैधरित्या राहणा-या तीन बांग्लादेशी नागरीकांना एमआयडीसी पोलिसांनी घेतले ताब्यात..बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड चा करत होते वापर  सचिन मोकळं अ...

 अवैधरित्या राहणा-या तीन बांग्लादेशी नागरीकांना एमआयडीसी पोलिसांनी घेतले ताब्यात..बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड चा करत होते वापर 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि२७):-जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी अहिल्यानगर हददीत आपले अस्तित्व लपवुन अवैधपणे राहणा-या बांगलादेशी नागरीकांबाबत महिती काढुन पोलीस स्टेशनला कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते.दि.२६ जून २०२५ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे  सपोनि.माणिक बी.चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,एमआयडीसी पोलीस स्टेशन हददीत पोखर्डी गावाच्या शिवारात काही संशयित बांगलादेशी नागरीक कुठलाही व्हिजा अथवा परवानगी नसताना विनापरवाना घुसखोरी करुन राहत आहेत.अशी गोपनिय माहिती मिळाल्याने एमआडीसी पोलीस स्टेशनचे दहशतवाद विरोधी पथकातील अधिकारी व अमंलदार यांचे समवेत जाऊन खात्री केली असता पोखर्डी गावाचे शिवारात वारुळे वस्ती येथील खडी क्रेशरचे जवळ एका सिमेंटचे बाधंकाम असलेले खोलीत तिन संशयित इसम मिळुन आले त्यांना त्यांची नाव गावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे १)जहांगिर अबुताहेर शेख वय-३४ वर्ष राहणार चातपुर ठाणा हजीगंज राज्य चेटोग्राम बाग्लांदेश २)हनीफ अब्दुल खलीद शेख वय-४० वर्ष राहणार खजीर खाली थाना शेनबाग पोस्टे शेबरहाट बांग्लादेश ३)मुश्रफ हबीब शेख वय-४० वर्ष रा.चातपुर ठाणा हजीगंज राज्य चेटोग्राम बाग्लांदेश असे सांगीतले.त्यांना भारतात येण्याबाबत काही व्हिजा अथवा काही परवानगी असल्याबाबत विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांचेकडे कुठलीही परवानगी अथवा परवानगीची कागदपत्रे मळुन आली नाही.त्यांचेकडे बनावट आधारकार्ड,पॅनकार्ड,व इतर बनावट कागदपत्रे मिळुन आली असुन ती जप्त करण्यात आली आहे.सदर बांगलादेशी  नागरीकांवर एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कामगिरी श्री. सोमनाथ घार्गे सो. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.अमोल भारती  अति.चार्ज उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि.माणिक बी.चौधरी प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोसई.मनोज मोंढे,सफौ.राकेश खेडकर,पोहेकॉ.राजु सुद्रीक, पोकॉ.किशोर जाधव,पोकॉ.सुरज देशमुख,पोकॉ.जयशिंग शिंदे, पोकॉ.उमेश शेरकर,पोकॉ. दहिफळे,मोबाईल सेलचे पोकॉ. राहुल गुंडू यांचे पथकाने केली आहे.तसेच या कारवाई मध्ये सदन कमांड मिलिटरी इंटेलिजन्स यांची मदत घेण्यात आली.

No comments