adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

तुझ्या नव-याला घटस्फोट दे त्यांनतर आपण दोघे लग्न करु असे म्हणत अत्याचार करून पसार झालेल्या आरोपीस राजस्थान मधून ठोकल्या बेड्या

 तुझ्या नव-याला घटस्फोट दे त्यांनतर आपण दोघे लग्न करु असे म्हणत अत्याचार करून पसार झालेल्या आरोपीस राजस्थान मधून ठोकल्या बेड्या  सचिन मोकळं ...

 तुझ्या नव-याला घटस्फोट दे त्यांनतर आपण दोघे लग्न करु असे म्हणत अत्याचार करून पसार झालेल्या आरोपीस राजस्थान मधून ठोकल्या बेड्या 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि २७):-बलात्काराच्या गुन्हयातील फरार आरोपीस पकडण्यात एमआयडीसी पोलीसांना यश आले आहे.सदर आरोपीस राजस्थान येथून अटक केली आहे.यातील पिडीत फिर्यादी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की,पिडीत व आरोपी यांची ओळख झाली व यातील आरोपी याने फिर्यादीस तु तुझ्या नव-याला घटस्फोट दे व त्यांनतर आपण दोघे लग्न करु असे म्हणून फिर्यादीस विश्वासात घेवुन नोव्हेंबर २०२३ ते डिसेंबर २०२४ दरम्यान बोल्हेगाव फाटा येथे फिर्यादी राहत असलेल्या भाडयाचे रुममध्ये आरोपी नामे देविलाल भुराराम केडोलिया (रा. राजस्थान) याने वरील कालावधी मध्ये वेळोवेळी पिडीत फिर्यादी हिची इच्छा नसतांना तिचेवर बळजबरीने शारीरीक अत्याचार केला,म्हणून सदर आरोपी विरुदध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा रजि नंबर ४००/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ६४,६४ (२) (एम) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हयाचा तपास करत असतांना तात्रिक विश्लेषणाचे आधारे व सपोनि माणिक बी.चौधरी यांना गोपनिय बातमी मिळाली सदर गुन्हयातील आरोपी हा राजस्थान येथे आहे.त्यावरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करुन त्यांना पोलीस अधीक्षक यांच्या परवानगीने राजस्थान येथे पाठविले.सदर पथकाने आरोपीस बावडी राजस्थान येथे पकडले.सदरची कामगिरी श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री. अमोल भारती अति चार्ज उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहिल्यानगर यांचे मार्गदर्शानाखाली सपोनि.माणिक बी.चौधरी प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस सटेशन, पोसई.विकास जाधव,पोना. गणेश पालवे,पोकॉ.राजेश राठोड,पोकॉ.किशोर जाधव, यांनी केली आहे.

No comments