आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नवमतदारांनाही मतदानाचा हक्क द्या- इजि.सौ.कोमलताई तायडे अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमक...
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नवमतदारांनाही मतदानाचा हक्क द्या- इजि.सौ.कोमलताई तायडे
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर -:- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नवमतदारांची नावे समाविष्ट करून नवीन मतदार याद्या प्रसिध्द कराव्या, अशी मागणी उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे जनक्रांती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष इंजि.कोमलताई सचिन तायडे यांनी १३ जून रोजी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, येत्या काही दिवसात महाराष्ट्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. तरी स्थानीक वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांमधुन असे लक्षात येते कि, विधानसभा २०२४ च्या याद्या येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येण्याची शक्यता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकी नंतर ते विधानसभा निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रात साधारणत: ४० लक्ष एवढी (अंदाजे लोकसभा २०२४ मतदार संख्या - ९.३० कोटी, अंदाजे विधानसभा २०२४ मतदार संख्या- ९.७० कोटी) वाढ ६ महीन्यात झालेली असुन आतासुध्दा विधानसभा निवडणुका संपन्न होऊन ६ महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला असल्याने अंदाजे एवढेच म्हणजे ४० लक्ष नवमतदार राज्यात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी आपण या नवमतदारांना मतदानाची संधी देण्यासाठी नव्याने मतदार नोंदणी अभियान घेऊन पुन्हा नविन मतदार याद्या प्रसिध्द करण्यात याव्या. जेणे करुन कोणीही नवमतदार, नवयुवक मतदानाच्या हक्कापासुन वंचित राहणार नाही अशी आग्रही मागणी जनक्रांती फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा इंजि.सौ.कोमलताई सचिन तायडे यांनी केली आहे.

No comments