साकळी येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी भरत कोळी यावल ता.प्र. (संपादक -:-हेमकांत गायकवाड) मनवेल ता यावल : साकळी येथील शा...
साकळी येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी
भरत कोळी यावल ता.प्र.
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
मनवेल ता यावल : साकळी येथील शारदा विद्या
मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक एस. जे पवार होते तर व्यासपीठावर शिक्षक प्रतिनिधी आर सी जगताप,ज्येष्ठ शिक्षक जी एल चौधरी, वरिष्ठ लिपिक एस पी निळे भाऊसाहेब, किरणकुमार चौधरी, एन पी पाटील, के एम देसले आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक एस जे पवार यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनाविषयी सामाजिक न्याय दिन, आरक्षण, समानता, शिक्षण याविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के एम देसले यांनी केले व आभार एन पी पाटील यांनी मानलेत.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments