पुण्य नगरी आज भारावली माऊलीच्या पालखीचे पुण्यात आगमन पुणे प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज पुण्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालख...
पुण्य नगरी आज भारावली माऊलीच्या पालखीचे पुण्यात आगमन
पुणे प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज पुण्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आगमन झाले असून ह्या भव्य दिव्य सोहळ्यात सहभागी होणं म्हणजे नशिबच लागते.
पांडुरंगाच्या आशीर्वादाने प्रत्येक सामान्य माणूस असो व श्रीमंत पालखी दर्शना साठी येतातच श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पुण्य नगरीत आगमन झालेली काही दृश्य आपणास दाखवली जात आहे
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पवित्र प्रारंभप्रसंगी साक्षीदार होण्याचं भाग्य लाभलं. माऊलींच्या वारी सोहळ्याची शेकडो वर्षांची परंपरा आणि या परंपरेचा भाग होता येणे, हे निश्चितच आत्मिक समाधान आणि अध्यात्माची सर्वोच्च अनुभूती देणारे क्षण आहेत.
वारी ही केवळ एक परंपरा नाही, ती आत्मिक उन्नतीची वाट आहे. ती भक्ती, समानता आणि आत्मभान शिकवते. वारकरी संप्रदायाच्या संस्कारात टाळ-मृदंग, अभंग आणि "ज्ञानोबा-तुकोबा"चा जयघोष हा जीवनाचा अविभाज्य भाग होत असतो. आज त्याच भक्तिपंथाच्या सर्वोच्च उत्सवाला अर्थात वारीला सुरुवात करताना मन भारावून जात त्यामुळे सध्या पुण्यात गर्दी असुन भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे
No comments