शिष्यवृत्ती परीक्षेत नूतन विद्यालय,मलकापूरचे सुयश अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर:- इयत्ता पाचवी आणि आठवीची शा...
शिष्यवृत्ती परीक्षेत नूतन विद्यालय,मलकापूरचे सुयश
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- इयत्ता पाचवी आणि आठवीची शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आली होती. त्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला असून या परीक्षेमध्ये नूतन विद्यालय, मलकापूर येथील वर्ग पाचवी मधून यज्ञेश प्रमोद मैद, कु.अर्पिता विजय फिरके आणि आठवी मधून आर्यन दिगंबर किनगे हे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी प्राप्त ठरले आहेत.या विद्यार्थ्यांचा शाळेचे मुख्याध्यापक श्री ए.डी.बोरले सर,पर्यवेक्षक श्री पी.एस. टेकाडे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मिळवलेल्या यशामुळे ह्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.या विद्यार्थ्यांना श्री एच.के. डाबेराव सर,
श्री एम.ए.नाफडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments