गांधीतीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेत थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद शाळा राज्यातील ग्रामीण भागातून दुसऱ्या क्...
गांधीतीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेत थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद शाळा राज्यातील ग्रामीण भागातून दुसऱ्या क्रमांकाने सन्मानित
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव तालुक्यातील म्हसावद येथेल गांधीतीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेत राज्यातील सर्व शाळांनी आपला सहभाग नोंदविला होता. त्यातील सर्व उपक्रमांची अंमलबजावणी करणाऱ्या शाळांमधून आपल्या स्वा.सै.पं.ध.थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद शाळेला दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले.बक्षिसाचे स्वरू ३१००० रुपये रोख,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे.
हे बक्षिस गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त तथा जैन इरिगेशन सिस्टीम चे अध्यक्ष अशोक जैन यांचे शुभहस्ते विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.डी चौधरी सर यांनी स्वीकारले.
सागर मित्र अभियान पुणेचे सह- संस्थापक विनोद बोधनकर,जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल,महाराष्ट्र राज्य सल्लागार परिषदेचे सदस्य अनिल बोरणारे,स्पर्धा समन्वयक गिरीश कुलकर्णी या मान्यवरांच्या उपस्थितीत कस्तुरबा सभागृह,गांधीतीर्थ जैन हिल्स,जळगाव येथे पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.सदर पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.डी.चौधरी सर,पर्यवेक्षक के.पी.पाटील व ज्येष्ठ शिक्षिका एच.डी.हुजरे,ए.डी.नेवे,ए.आर.पाटील,टी.वाय.मगरे,एन.व्ही.पवार,मती बी.ए.चौधरी,एस.व्ही.पाटील,एस.एस.मराठे,के.एस.पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक जैन,सागर मित्र अभियान पुणे चे संस्थापक विनोद बोधनकर,जिल्हा परिषद जळगाव च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल,राज्य सल्लागार परिषदेचे सदस्य माननीय अनिल बोरणारे,राज्यस्तरीय स्पर्धा समन्वयक गिरीश कुलकर्णी तसेच ब.ग.विश्वस्त निधी अडावद संस्थेचे चेअरमन डॉ.के.पी.थेपडे यांनी मुख्याध्यापक पी.डी.चौधरी व सर्व शिक्षक बंधू भगिनींचे अभिनंदन केले.
No comments