जनतेच्या कामात दिरंगाई करू नका..... आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे. यांचे खडे बोल भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल...
जनतेच्या कामात दिरंगाई करू नका..... आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे. यांचे खडे बोल
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल पंचायत समिती मध्ये तालुकास्तरीय तक्रार निवारण सभा चोपडा यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार प्राध्यापक अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे तसेचयावल रावेर तालुक्याचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी प्रकल्प संचालक आर एस लोखंडे भाऊसाहेब अकलाडे बालकल्याण अधिकारी हेमंत भदाणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भोयेकर कार्यकारी अभियंता सुनील पाटील कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांच्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सभागृहात घेण्यात आली त्यात तालुक्यातील अनेक समस्यांची तक्रारीचे पाढे त्यात वाचले गेले नव्हे तर आमदार द्वयांनीपंचायत समिती मधील अनागोंदी कारभारा संदर्भात नाराजीचा सूर व्यक्त केला
यावल तालुक्यातील गुरांचे गोठे घरकुल तसेच शेततळे या संदर्भात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम जे होते त्यात संबंधितांकडून पैशांची मागणी होती तरच प्रकरणे मंजूर होतात आणि पैसे दिले म्हणजे तक्रारी तात्काळ निपटारा केला जातोअसा चक्क आरोप आमदार प्राध्यापक अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे व आमदार अमोल आहे भाऊ जावळे यांनी या सभेत केला कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून व आम्ही सुखदुःखामध्ये जेव्हा गावागावात फिरतो तेव्हा या संदर्भातच तक्रारी येतात याकडे पंचायत समिती प्रशासन लक्ष गांभीर्याने देत नाही तर हप्ता टाकण्यास लाभार्थ्यांना वारंवार चकरा माराव्या लागतात नव्हे तर पैसे दिले तरच काम होतात अशा अनेक तक्रारी यावल पंचायत समितीच्या संदर्भात आहेत असे या तक्रार निवारण सभेमध्ये अनेक लाभार्थ्यांनी हाच विषय धरून ठेवला व आमदारांनी याबाबत अधिकारी संबंधित कर्मचाऱ्यांना चांगले धार्यावर धरले
तालुक्यात टंचाई आराखड्याची बैठक गटविकास अधिकारी यांनी घेतली मात्र दोन्ही आमदारांना सुद्धा बोलावले नाही ही कशी मनमानी सुरू आहे यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जळगावश्रीमती करनवालं यांनी तात्काळ या गावचे ग्रामसेवक यांनी ठराव घेऊन येथे नागरिकांच्या पाण्यासाठी टॅंकर उपलब्ध करून द्या अशी आदेश दिले पावसाळा चालू झाला आहे पाईपलाईन गळती शोधावी डायरीयाची लागण होणार नाही ब्लिचिंग पावडर टाका पंधराव्या वित्त आयोगातून वाटल्यास निधी खर्च करा गावाचा विकास करण्यासाठी ग्रामसेवकांनी काळजी घ्यावी ग्रामस्थ त्यांना सहकार्य करतात त्यांनीही हातभार लावावा आणि वित्त आयोगाचे काम निकृष्ट होणार नाही तक्रारी होणार नाही याची काळजी घ्या असे कान पिचक्याही आमदारांनी यावेळी दिल्या
तालुका आदिवासी बहुल एरियातील आहे त्यामुळे तालुका वाशी उपेक्षितच आहेत निधी अभावी तालुक्यात आदिवासींचा विकास होत नाही घरकुल व गोट्यांच्या संदर्भात यापुढे कुठलेही तक्रार आल्यास संबंधित ग्रामसेवक व संबंधित यंत्रणेवर कडक कारवाई करण्यात येईल असे मुख्यकार्यकारी अधिकारीश्रीमती करनवाल यांनी यावेळी सूचित केले
तालुक्यात पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरणाची मोहीम व्यवस्थितरीत्या राबवली जात नसल्यामुळे खाजगी डॉक्टरांकडून शेतकरी व शेतमजुरांना गुराढोरांना उपचार करून घेण्यासाठी पैसे मोजावे लागतात या संदर्भात आमदार द्वयांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगले धारेवर धरले त्यांना साधे उत्तर देता आले नाहीत तरघरकुलांची किती कामं पेंडिंग आहेत ती लवकरात लवकर ज्या त्रुटी असतील त्या दुरुस्त करून त्वरित घरकुलांची काम सुरू करावी व निधी खर्च करावा असेही यावेळी सांगण्यात आले जळगाव जिल्हा मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती करणवाल यांनी ग्रामसेवकांसाठी जनतेचा किती रोष आहे हे आज आखो देखी पाहिली यासाठी बायोमेट्रिक लावण्यात येईल व ज्या गावांच्या शाळेची परिस्थिती गंभीर आहे ज्या पडू शकतात या संदर्भात शिक्षण विस्तार अधिकारी यांनी तात्काळ माहिती द्यावी असेही सूचना यावेळी त्यांनी केल्या
यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी या गावागावांना भेट देत नाहीत तर जे कोणी खेड्यावरून पंचायत समितीमध्ये भेटीसाठी आलेतर भेटत नाही जर उपस्थित राहिल्या तर अमुक वेळेतच भेटा असे फलक त्यांच्या बोर्डावर लावण्यात आलेले आहे या संदर्भातही या मीटिंगमध्ये चर्चा झाली
अपंग बांधवांनी पाच टक्के दिव्यांग निधी संदर्भात प्रश्न उपस्थित केला त्यात काही ग्रामसेवक वसुलीच्या नावाखाली आमच्या निधीच्या गैर व्यवहार करतात तो निधी मिळत नाही असा आरोप दिव्यांग आघाडी चे दहिगाव येथील हरिभाऊ पाटील आणि अरुण पाटील नायगांव कर यांनी यासंदर्भात मुख्याधिकारी यांना सांगितलेतसेच अपंग बांधवांसाठी यावर शहरात एखादी जागा देऊन त्या ठिकाणी भवन साठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सुद्धा अपंगांतर्फे करण्यात आले यावर येणाऱ्या अधिवेशनात आवाज उठवू व सदरच्या मागणी संदर्भात निश्चित पाठपुरावा करू असे यावेळी आमदारांनी अपंग बांधवांना आश्वासित केले तर जिप मुख्य कार्यकारी अधिकारीश्रीमती करनवाल त्यानुसार सर्व ग्रामसेवकांना जिल्हाभरातील अपंगांसाठी समिती तात्काळ निधी देण्यात यावा असे अधिकाऱ्यांना आदेशितच केले जे ग्रामसेवक पारदर्शी काम करणार नाहीत व काम चुकारपणा करतील त्यांना थेट निलंबित केले जाईल असे जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करनवाल यांनी इशाराच दिला
नंतर स्वतंत्र अधिकाऱ्यांचीआणि ग्रामसेवक व कर्मचारी यांची बैठक दोन्ही आमदारांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी जळगाव यांनी घेतली त्यात ग्रामसेवकांनी जनतेशी कसे वागावे शासनाचा निधी खर्च करण्यासंदर्भात आणि ज्या तक्रारी येतात त्याचा निपटारा आपण गाव स्तरावर जर केला तर पंचायत समिती पंचायत तक्रारी येणार नाहीत व तक्रारदारांना प्रवासाचा खर्च व पूर्ण दिवस वाया जाणार नाही जनतेशी बंधू भावाने प्रेमाने वागावे असा प्रेमाचा सल्ला आमदार प्राध्यापक अण्णा साहेब चंद्रकांत सोनवणे व आमदार अमोल जावळे यांनी दिला शासनाचा निधी पुरेपूर कसा खर्च होईल व जनतेच्या सुविधा कशा पोहोचवल्या जातील आमच्यापर्यंत फक्त तक्रार येणार नाही याची दखल प्रशासनातील सर्व कर्मचाऱ्यांनी घ्यावी असेही दोन्ही आमदारांनी यावेळी सूचित केले
माजी जि. प. सदस्य सुभाष आप्पा सोळुंके,बबलू कोळी उपसभापती, सूर्यभान पाटील सर संचालक,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल भाऊ चौधरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण बापू चौधरी उज्जैनसिंग राजपूत विलास चौधरी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे कृषी उत्पन्न बाजार समिती मा . सभापती मुन्ना पाटील भरत चौधरी सर सरपंच समाधान सोनवणे कोळन्हावी सरपंच गोटू सोळुंके , गोटू सोनवणे समाधान सोनवणे, सुधाकर पाटील,अण्णा कोळी,दिनकर महाजन, विनोद खेवलकर,यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments