adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

साकळी - किनगाव मंडळाच्या वतीने भाजपा मार्फत जागतिक योग दिवस साजरा

  साकळी - किनगाव मंडळाच्या वतीने भाजपा मार्फत जागतिक योग दिवस साजरा भरत कोळी यावल ता.प्र. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : साकळी येथील भव...

 साकळी - किनगाव मंडळाच्या वतीने भाजपा मार्फत जागतिक योग दिवस साजरा



भरत कोळी यावल ता.प्र.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल : साकळी येथील भवानी माता मंगल कार्यालयात येथे योग शिबीर आयोजित केले होते. 

    सुरुवातीला प्रस्तावना डॉ. सुनिल पाटील भाजपा वैद्यकीय आघाडी जिल्हा उपाध्यक्ष व योगदिवस संयोजक यांनी केली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जागतिक पातळीवर आजचा दिवस योग दिवस साजरा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटना UNO मध्ये २७ सप्टेंबर २०१४ यादिवशी भाषणाद्वारे योगाचे मानवी जीवनातील महत्व पटवून दिले, त्यामुळेच आजचा दिवस म्हणजे २१ जुन हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर योग दिवस साजरा केला जातो, असे नमूद केले. ५ooo वर्षांपासून भारतातील ऋषीं मुनी यांनी योग जगाला दिला, व मानवी जीवनातील महत्व सांगितले. योगा हा मन, शरीर यांना जोडून ठेवण्याचे साधन आहे असे प्रतिपादन डॉ. सुनिल पाटील, साकळीकर यांनी केले.

    योगशिक्षक म्हणून श्री रामकृष्ण खेवलकर, साकळीकर यांनी वेगवेगळे योग आसन करून दाखविले. व सर्वांकडून करून घेतले. त्याचे शारीरिक व मानसिक महत्व पटवून सांगितले.

  शिबिरास भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते. मंडळ अध्यक्ष अनिल पाटील, किनगाव, रविंद्र पाटील, माजी जिप सभापती, आप्पासाहेब प्रभाकर सोनवणे, उज्जैन सिंग काका राजपूत,  माजी जि प सदस्य, विलास नाना पाटील, कृऊबास संचालक, सुनिल नेवे, विकासो चेअरमन, विलास दादा काळे, माजी ग्राप सदस्य, तेजस पाटील, माजी उपसभापती शेतकी संघ यावल, सूर्यभान बडगुजर, राजेंद्र नेवे साहेब, नितीन फन्नाटे, आप्पासाहेब योगेश खेवलकर मयूर पाटील, दहिगाव, अजय पाटील, पिळोदा, विशाल पाटील, विकी सोनवणे, ज्ञानेश्वर सोनार, विशाल वाघळे, नितीन महाजन, विनोद खेवलकर ग्रा प सदस्य, आकाश पाटील, गिरीष प्रजापती उपस्थित होते.आभार तेजस पाटील यांनी व्यक्त केले.

No comments