अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय कमळगाव येथे जागतिक योगा दिन उत्साहात साजरा... चोपडा प्रतिनिधी (संपादक-:- हेमकांत गायकवाड) कमळगाव तालुका...
अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय कमळगाव येथे जागतिक योगा दिन उत्साहात साजरा...
चोपडा प्रतिनिधी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
कमळगाव तालुका चोपडा येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय मळगाव आज २१ जून जागतिक योगा दिनानिमित्त मोठ्या उत्साहात योगा दिन साजरा करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक सहभागी झाले.त्यावेळी शाळेतिल क्रिडा शिक्षक श्री पाचपोळ सर,व नितिन पाटील सर यांनी योगा चे महत्व पटवून दिले.आरोग्यासाठी योगासने व प्राणायाम किती महत्त्वाचे आहे ते समजवले.तसेच कला शिक्षक अर्जुन कोळी सर यांनी फलक लेखन करुन योगा दिनाचे महत्त्व विशद केले.सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.


No comments