तांदळवाडी गावात शिवसेना सदस्य नोंदणी मोठ्या उत्साहात संपन्न चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा विधानसभा मतदारसंघाचे कार्य...
तांदळवाडी गावात शिवसेना सदस्य नोंदणी मोठ्या उत्साहात संपन्न
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे व माजी लोकप्रिय आमदार लताताई सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तांदळवाडी ता.चोपडा येथे दिनांक.१४/०६/२०२५ शनिवार रोजी शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान २०२५/२६ अंतर्गत परिसरातील येथे शेकडो शिवसैनिक आणि महिला शिवसैनिक माता-भगिनी यांनी सदस्य नोंदणी अर्ज भरून शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी करून घेतली. सदस्य नोंदणी अभियानात तांदळवाडी गावातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सदस्य नोंदणी अभियान राबविण्यासाठी शिवसेना प्रसिद्धीप्रमुख समाधान कोळी,भिकन कोळी,अभिषेक कोळी,प्रमोद धनगर,महिंद्रा धनगर,ज्ञानेश्वर कोळी,तसेच गावातील सर्व तरुण मंडळ उपस्थित व शिवसैनिक व महिला भगिनी उपस्थित होते.

No comments