स्व. निखिलभाऊ खडसे सेमी इंग्लिश स्कूल मुक्ताईनगर येथे आरटीई व पोस्को कायद्यावरील जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न मुक्ताईनगर प्रतिनिधी ...
स्व. निखिलभाऊ खडसे सेमी इंग्लिश स्कूल मुक्ताईनगर येथे आरटीई व पोस्को कायद्यावरील जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्व. निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मीडियम स्कूल, मुक्ताईनगर येथे तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ, मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी “बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोस्को ॲक्ट 2012)” व “मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (RTE Act)” या विषयांवर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे मा. न्यायाधीश बी. जी. पवार (न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, मुक्ताईनगर) होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. जगदीश निकम यांनी विद्यार्थ्यांना RTE कायद्याचे महत्त्व, उद्देश व शैक्षणिक अधिकारांची माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क आहे आणि सरकार यासाठी विविध सुविधा पुरवते.
तसेच ॲड. के. एस. गवई यांनी पोस्को कायदा 2012 विषयी सखोल माहिती देत, समाजात वाढत असलेल्या बालकांवरील लैंगिक अत्याचारांविषयी जागरूकतेचे महत्त्व सांगितले. त्यांनी मुला-मुलींना आत्मसुरक्षिततेबाबत जागरूक राहण्याचे व कोणत्याही अत्याचाराच्या वेळी कायदेशीर मदत घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात मा. न्यायाधीश बी. जी. पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दोन्ही कायद्यांचे सामाजिक महत्त्व, शैक्षणिक हक्कांची जाणीव आणि सुरक्षित बालपण याबाबत विद्यार्थ्यांना प्रबोधन केले.
शाळेचे मुख्याध्यापक व्ही. के. वडस्कर यांनीही विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन करत असे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक स्वप्नील सुधाकर चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन तुषार पाटील सर यांनी केले. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी ठरला.



No comments