राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१व्या जन्मदिवसाची (२६ जून १८७४) उत्स्फूर्त जयंती साजरी भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:-हेमकां...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१व्या जन्मदिवसाची (२६ जून १८७४) उत्स्फूर्त जयंती साजरी
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
दि.२७ जून विरवली ता.यावल येथे आलेल्या डॉ.उल्हास पाटील कृषि महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या कृषिकन्यानी सामाजिक न्यायाचे प्रणेते आणि बहुजनांच्या आयुष्य वाहून घेणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती जि.प. मराठी शाळेत मोठ्या उत्साहात साजरी केली. विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापिका योगेश्वरी धनगर मॅडम यांनी प्रतिमेची पुजा करून फुलहार अर्पण करून पुढील कार्यक्रमास सुरुवात केली. कार्यक्रमास मान्यवरांनी उपस्थिती लावून, शाहू महाराजांनी लावलेल्या समतेच्या व शिक्षणाच्या दीपाची आठवण करून दिली. त्यांच्या विचारांनी आजच्या तरुण पिढीने प्रेरणा घ्यावी, असे आवाहन वक्त्यांनी केले.
शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारण, स्त्री शिक्षण, आरक्षण धोरण, आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी मोठ्या प्रमाणात कार्य केले. आजही त्यांचे विचार आणि कार्य समाजाला दिशा देणारे आहेत. असे वक्त्यांनी आपल्या व्याख्यान्यातून विद्यार्थीना सांगितले.
कार्यक्रमाचे संयोजक कृषिकन्या धनश्वेता अहिरे, प्रज्ञा गजरे, ऐश्वर्या सोनवणे, सृष्टी डोंगरे, प्रतीक्षा गावित, विशाखा सोनावणे, यांनी केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका योगेश्वरी धनगर, शिक्षकवृंद प्रियंका तायडे, सुवर्णा पाटील, सोबतच अंगणवाडी शिक्षिका कविता पाटील,भावना पाटील तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कृषिकन्यांना कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. शैलेश तायडे सर, कार्यक्रम समनव्यक प्रा. बी. एम. गोणशेटवाड सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. म.पी भोळे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments