चुंचाळे येथील अमीत तडवी टॉप स्कॉप ऑफ द मंथ म्हणून सन्मानीत. भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी : (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर येथील डी वा...
चुंचाळे येथील अमीत तडवी टॉप स्कॉप ऑफ द मंथ म्हणून सन्मानीत.
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील डी वाय एस पी कार्यालय अंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस अंमलदारांचे कौतुक व्हावे. त्यांच्यामध्ये सांघिक भावना निर्माण व्हावी, पोलिसांनी काम चांगले करावे, यासाठी पोलीस स्टेशन टॉप कॉप ऑफ द मंथ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक पोलीस स्टेशनच्या एका कर्मचाऱ्यांची निवड करून त्याला प्रत्येकी प्रमाणपत्र आणि एक हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस दिले जात आहे. तेव्हा नुकतेच यावल पोलीस स्टेशनचे पोलिस नाईक चुंचाळे येथील रहिवासी अमित तडवी यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले.उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला. तेव्हा या या सन्माना बद्दल त्यांचे पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे सह आदिंनी त्यांचे अभिनंदन केलेे
No comments