कमरेला गावठी कट्टा लावुन दहशत निर्माण करणा-या तरुणास चोपडा शहर पोलिसांनी केले जेरबंद चोपडा शहर पोलिसांची आता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसम...
कमरेला गावठी कट्टा लावुन दहशत निर्माण करणा-या तरुणास चोपडा शहर पोलिसांनी केले जेरबंद
चोपडा शहर पोलिसांची आता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमानवर करडी नजर
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दिनांक-२६/०६/२०२५ रोजी सांय. १८.४५ वा.चे सुमारास चोपडा शहर पो.स्टे.पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळालेल्या गुप्त बातमी नुसार चोपडा शहर पोलिसांनी नगरपालीकेच्या पाठीमागील कब्रस्थाना जवळ एक इसम त्याचे कमरेला गावठी कट्टा लावुन दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरत असतांना संशय आले वरुन त्यास चोपडा शहर पोलीसांनी ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला ४०,०००/- रु किमतीचा एक गावठी कट्टा मिळुन आल्याने त्यास त्यांचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव कार्तीक रविद्र पवार वय २१ वर्षे रा जुना पारधीवाडा अमळनेर, ता अमळनेर जि जळगाव याचे विरुध्द चोपडा शहर पो स्टेला गुन्हा दाखल करुन गुरन ३९३/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ सह महा. पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदर गुन्ह्याचा तपास सपोनि एकनाथ भिसे हे करीत आहे.
सदरची कामगीरी डॉ महेश्वर रेडी पोलीस अधिक्षक जळगाव,कविता नेरकर अपर पोलीस अधिक्षक चाळीसगाव,याचे मार्गदर्शनाखाली व अण्णासाहेब घोलप उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा,उपविभाग याचे सुचना प्रमाणे पोलीस निरिक्षक मधुकर साळवे,सहाय्यक पोलीस निरिक्षक एकनाथ भिसे,सहाफौ जितेन्द्र सोनवणे,सहाफौ दिपक विसावे पोहेकॉ संतोष पारधी,पोहेकॉ ज्ञानेश्वर जवागे,पोहेकाँ हर्षल पाटील पोना संदिप भोई,पोकॉ विनोद पाटील,पोकॉ निलेश वाघ,पोकॉ प्रकाश मधुरे,प्रमोद पवार,यांनी केली आहे.


No comments