दिंडी मार्गावरील रस्त्याची दुरुस्ती करा जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या सूचना सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल...
दिंडी मार्गावरील रस्त्याची दुरुस्ती करा जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या सूचना
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.२२):-जिल्ह्यातून पंढरपूरकडे अनेक दिंड्यातून वारकरी पायी चालत जातात. या सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी.ज्या ठिकाणी खड्डे पडले असतील ते बुजवण्यात यावेत,अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी संबंधित प्रशासनाला दिल्या आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी म्हणाले की, अहिल्यानगर शहरासह इतर ठिकाणच्या उ्डडाणपूल अथवा अपघातप्रवण स्थळांची पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग व परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव,एस.आर.वर्पे,विजय कोटेचा,सहायक अधीक्षक अभियंता एस.डी. शेळके, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे आदी उपस्थित होते.

No comments