नामंजूर नोंदी मंजूर केल्याप्रकरणी मंडळ अधिकारी यांना बडतर्फ करा- केदार सानप भुसावळ प्रतिनिधी (संपादक हेमकांत गायकवाड) भुसावळ - तालुक्याती...
नामंजूर नोंदी मंजूर केल्याप्रकरणी मंडळ अधिकारी यांना बडतर्फ करा- केदार सानप
भुसावळ प्रतिनिधी
(संपादक हेमकांत गायकवाड)
भुसावळ - तालुक्यातील कुर्हे प्र.न. मंडळ अधिकारी यांनी वराडसीम, साकेगाव व गाेंंभी शिवारातील गटांवरील नामंजूर नोंद मंजूर करून आपल्या पदाचा गैरवापर केला, असा तक्रार अर्ज सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिला असून मंडळ अधिकारी यांना सेवेतून बडतर्फे करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
दिलेल्या तक्रार अर्जात, तालुक्यातील कुर्हे प्र.न. येथील मंडळ अधिकारी प्रविण लक्ष्मण पाटील यांनी पदाचा गैरवापर करून वराडसीम गट नं. 382 नामंजूर नोंद 9562 व मंजूर नोंद 9567, साकेगाव शिवारातील गट क्र. 298/1/1/ब/2 वरील नोंद क्र.31359 अगोदर नामंजूर केली व त्याच गटातील 31492 नोंद मंजूर केली. तसेच गोंभी शिवारातील गट नं. 23 वरील नोंद नं.1383 नामंजूर करून 1385 व 1407 या नोंद मंजूर केल्या, असा तक्रारी अर्ज दि. 9 जून 2025 रोजी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिला असुन अर्जासोबत सदरील नोंद संदर्भातील कागदपत्रे जोडलेले आहे. या तक्रारी अर्जात मंडळ अधिकारी यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी व सेवेतून बडतर्फ करण्यात यावी अशी मागणी केली आहे. व झालेल्या कारवाईची एक प्रत माहितीस्तव मला देण्यात यावी अशी विनंती केदारनाथ सानप यांनी केली आहे.

No comments