आमोदा येथे देवांशी ट्रॅव्हल पलटली; मोठा अपघात टळला इदू पिंजारी फैजपर (संपादक हेमकांत गायकवाड) आमोदा या गावा जवळील मोर नदीच्या वळणावर आज दे...
आमोदा येथे देवांशी ट्रॅव्हल पलटली; मोठा अपघात टळला
इदू पिंजारी फैजपर
(संपादक हेमकांत गायकवाड)
आमोदा या गावा जवळील मोर नदीच्या वळणावर आज देवांशी ट्रॅव्हल्सची (MH 23 W 4084) बस पलटली. ही बस औरंगाबाद येथून रावेरकडे लग्नासाठी वरात घेण्यासाठी निघाली होती. मोर नदीजवळील तीव्र वळणावर बसचालक ओव्हरटेक करताना समोरील ट्रकला धडक टळावी म्हणून बस थेट खड्ड्यात घालून पलटी केली.सुदैवाने मोठा अपघात टळला असून बसमधील प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे. या महिन्यात मोर नदीच्या वळणावर झालेला हा तिसरा अपघात असल्यामुळे स्थानिकांकडून वळणांवर गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसवण्याची मागणी होत आहे.

No comments