adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पाच दिवसाच्या निसर्गोपचार क्रियेमुळे शारीरिक तंदुरुस्ती ;आ एकनाथराव खडसे

  पाच दिवसाच्या निसर्गोपचार क्रियेमुळे शारीरिक तंदुरुस्ती ;आ एकनाथराव खडसे इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:-हेमकांत गायकवाड) फैजपूर आजच्या धकाध...

 पाच दिवसाच्या निसर्गोपचार क्रियेमुळे शारीरिक तंदुरुस्ती ;आ एकनाथराव खडसे



इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

फैजपूर आजच्या धकाधकीच्या जीवनात   माणसाने आयुष्यभर जर आपल्या शरीराकडे दुर्लक्ष केले तर काही दिवसानंतर शरीरही आपल्याकडे दुर्लक्ष करते व आपल्याला वेगवेगळ्या व्याधींना सामना करावा लागतो म्हणून वेळीच नित्य नियमाने शरीराच्या तंदुरुस्तीकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत आमदार एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले. ते श्री निष्कलंक धाम वढोदा ( फैजपूर ) येथील तुलसी हेल्थ केअर सेंटरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. 

   महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांच्या संकल्पनेतून व अथक परिश्रमातून  आपल्या भागात असे सुंदर निसर्गरम्य व सर्व सोयींनी युक्त, इतरांच्या तुलनेत अत्यंत माफक दरात 'ना नफा ना तोटा ' या जनहितार्थ भावनेतून  निसर्गोपचार केंद्र सुरू केले आहे याचा फायदा सर्वांना व्हावा याच उद्देशाने आज ही पत्रकार परिषद घेत असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या धकाधकीच्या जीवनात एक मिनिटाची फुरसत नसताना मी येथे पाच दिवसापासून निसर्गोपचार घेत आहे. याचा विलक्षण असा अनुभव व फायदा मला झाला आहे.   मला अनेक शारीरिक व्याधी असल्याने भारतासह इतर अनेक ठिकाणी वेगवेगळे खर्चिक उपचार घेतले. मात्र या ठिकाणी मला मनापासून फायदा झाला असल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी पाच दिवसाच्या कोर्समध्ये पहिल्या दिवसापासून सकाळी पाच वाजता उठून रात्री झोपेपर्यंत वेगवेगळ्या ५२ उपचार पद्धतीचा अवलंब करून शरीर शुद्धी केली जाते. आचार्य सचिन जी आपल्या टीमसह प्रत्येकाच्या वयानुसार, आजारानुसार, आहार-विहारानुसार योगा व निसर्गोपचार पद्धतीने शरीरातील घाण साफ करून  असलेल्या व्याधी कायमच्या दूर होण्यासाठी अत्यंत साध्या सोप्या व दूरगामी फायदेशीर असलेल्या बाबीवर उपचार करून घेतात. मानसिक स्वास्थ्यासाठी निसर्गरम्य वातावरण,  सात्विक भोजन, वनस्पती व फळांचा ज्यूस, वातानुकूलित रूम सह  राहण्याची उत्तम व्यवस्था, हिरवेगार लॉन, पायी चालण्यासाठी उत्तम ट्रॅक, अत्याधुनिक उपकरणाच्या माध्यमातून उपचाराने पाच दिवसाच्या शिबिरात प्रत्येकी दोन ते पाच किलो वजन कमी हा प्रत्यक्ष अनुभव या ठिकाणी आम्ही सर्व शिबिरार्थिनी घेतला आहे. विशेष म्हणजे मानसिक स्वास्थ्यासाठी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या सान्नीध्यात या ठिकाणी आध्यात्मिक शक्तीही मिळते ती अत्यन्त मोलाची व महत्वाची असल्याचे नाथाभाऊंनी आवर्जून सांगितले. परिसरातील नागरिकांसह आपल्या नातेवाईकांनीही या निसर्गरम्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला  आचार्य सचिनजी यांनी तुलसी हेल्थ केअर सेंटर मधील निसर्गोपचार केंद्राच्या उभारणी मागे महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांचा भविष्यकालीन उद्देश, यासाठी त्यांचे अथक परिश्रम,  शिबिराचे महत्त्व व आतापर्यंत गेल्या तीन वर्षापासून  शिबिरार्थीना झालेला लाभ याविषयी माहिती दिली. ह्या पत्रकार परिषदेस पत्रकार बांधववासह शिबिरार्थी व निष्कलंक धाम येथील सर्व सेवाकर्ते  उपस्थित होते.

No comments