adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आता माझी जगायची इच्छा संपली' आयटी अभियंता तरुणीने संपविला जीवन प्रवास..!!

  आता माझी जगायची इच्छा संपली' आयटी अभियंता तरुणीने संपविला जीवन प्रवास..!!  अभिलाषा ने २१ व्या मजल्यावरून मारली उडी   संभाजी पुरीगोसावी...

 आता माझी जगायची इच्छा संपली' आयटी अभियंता तरुणीने संपविला जीवन प्रवास..!! 

अभिलाषा ने २१ व्या मजल्यावरून मारली उडी 


 संभाजी पुरीगोसावी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पिंपरी : माझी जगायची इच्छा संपली आहे, अशी चिठ्ठी लिहून आयटी अभियंता असलेल्या तरुणीने इमारतीच्या २१व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. हिंजवडी येथील द क्राऊन ग्रीन सोसायटीमध्ये ३१ मे रोजी ही घटना घडली. 

अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे (२५, रा. हिंजवडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. अभिलाषा हिंजवडी आयटी पार्कमधील एका आयटी कंपनीत नोकरी करत होती. तिची एक मैत्रीण द क्राऊन ग्रीन सोसायटीमध्ये राहत होती. ३१ मे रोजी पहाटे ती मैत्रीण राहत असलेल्या सोसायटीमध्ये दुचाकीवरून आली. लिफ्टने इमारतीच्या २१ व्या मजल्यावर गेली. तेथून तिने उडी मारून आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोसायटीच्या पार्किंगमध्ये आढळलेल्या दुचाकीवरून पोलिसांनी अभिलाषा हिची ओळख पटवली. पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

बाथरुमच्या भिंतीवर रक्ताचे डाग:

अभिलाषा हिच्यासोबत राहत असलेल्या तिच्या मैत्रिणीशी पोलिसांनी संपर्क साधला. अभिलाषा रात्री एक वाजतापर्यंत रूममध्ये होती. त्यानंतर मी सकाळी पाच वाजता उठले असता ती रूममध्ये दिसून आली नाही. त्यावेळी बाथरूम भिंतीवर रक्ताचे पुसट डाग दिसले. परंतु त्याबाबत लक्षात आले नाही. त्यानंतर मी पुन्हा सकाळी दहा वाजता उठले असता, अभिलाषा रूममध्ये आली नव्हती. त्यामुळे तिच्याशी संपर्क करीत होते. परंतु तिचा फोन बंद असल्याने संपर्क झाला नाही. काही वेळाने पोलिसांकडून मला या घटनेबाबत समजले. त्यानंतर आम्ही पुन्हा रूमची पाहणी केली असता अभिलाषा हिच्या बेडवर नॅपकिन व इनरवर रक्ताचे डाग दिसून आले, असे अभिलाषाच्या मैत्रिणीने पोलिसांना सांगितले. 

नॅपकीन, मोबाइल जप्त:

पोलिसांनी घरात पाहणी केली असता, अभिलाषा हिने लिहिलेली सुसाईड नोट मिळून आली. ‘माझी जगायची इच्छा संपली आहे. मी हे स्वत:च्या मर्जीने करत आहे’ असे चिठ्ठीमध्ये लिहिले आहे. रक्ताचे डाग असलेले नॅपकिन, इनर, उशीचे कव्हर व मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहे. तिने चिठ्ठीत लिहिलेल्या मजकुराप्रमाणे तिने नैराश्यातून आत्महत्या केली असल्याची शक्यता असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

No comments