मुक्ताईनगरमधील तीन गावांमध्ये विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत शेती मार्गदर्शन तज्ज्ञांनी सांगितले पेरणीआधी बीजप्रक्रिया करा,ड्रोनद्वारे...
मुक्ताईनगरमधील तीन गावांमध्ये विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत शेती मार्गदर्शन
तज्ज्ञांनी सांगितले पेरणीआधी बीजप्रक्रिया करा,ड्रोनद्वारे फवारणीची करून दाखवली प्रात्यक्षिके
किरण धायले मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पाल येथील कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभाग मुक्ताईनगर व आत्मा जळगाव यांनी सुंदर पातोंडी,बेलसवाडी व अंतुर्ली येथे विकसित कृषी संकल्प अभियान राबवले.त्यात बुधवार दिनांक 04 जून 2025 रोजी शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया,ड्रोनद्वारे फवारणी,गुरांसाठी मुरघास,केळी कंद प्रक्रिया प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.पाल येथील के.व्ही.कि.चे शास्त्रज्ञ डॉ धीरज नेहेते यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत माहिती दिली.बीज प्रक्रियेचे महत्व सांगून प्रात्यक्षिक करून दाखवले,केळी खत व्यवस्थापन,जैविक कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना सांगितल्या,राजगुरूनगर येथील राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन संचालनालय प्रधान वैज्ञानिक डॉ.अमरजित गुप्ता यांनी कांद्याच्या विविध वाणांची माहिती व वैशिष्ट्ये सांगितली.डॉ हेमराज भंडारी,वरिष्ठ शास्त्रज्ञ,राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन संचालनालय,राजगुरुनगर यांनी कीडरोग व्यवस्थापन मार्गदर्शन केले.डॉ सुहास अमृतकर,सहाय्यक प्राध्यापक,पशुविज्ञान महाविद्यालय अकोला यांनी मुरघास तंत्रज्ञान व पशु रोग संदर्भात मार्गदर्शन केले.इफको कंपनीचे संकेत महाजन यांनी प्रात्यक्षिकात ड्रोनच्या सहाय्याने फवारणी करून त्याचे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगितले.वेळ,खर्च व मजूर बचतीसह अचूक फवारणीचा लाभ कसा मिळतो याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.या कार्यक्रमाला अभिजीत शिंदे,तालुका कृषी अधिकारी मुक्ताईनगर,सैंदाने तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा आणि कृषी विभाग कर्मचारी उपस्थित होते,कृषी संकल्प अभियानांतर्गत प्रशिक्षणाला उपस्थित शेतकरी,अंतुर्ली येथे कृषिरत्न दिनेश पाटील,एस ए भोईसर,भाऊराव महाजन,सुनील पाटील,बबलू मेढे ग्रामपंचायत सदस्य,ताहेरखा पठाण ग्रामपंचायत सदस्य,विलास पांडे,राजू शिरतुरे,किशोर मेठे पोलीस पाटील,अनिल वाडीले,शेख सर,प्रशांत महाजन,राजेंद्र शिरतुरे,संजय दाणी,गणेश पाटील,ईश्वर बेलदार,उखर्डू बेलदार,बाळू मेठे,राजू कोळी कोतवाल,गणेश महाजन तसेच सुंदर पातोंडी येथे गणपत महाजन,भास्कर पाटील,सुनिल पाटील,रमेश महाजन,विश्वनाथ महाजन,राजेंद्र पाटील,भागवत पाटील,रामदास पाटील,बेलसवाडी येथे विनायक पाटील,सरपंच मंदाकिनी कोळी,उपसरपंच रमेश चौधरी,मनीष पाटील,रवींद्र पाटील,विनोद महाजन,विनोद महाजन,प्रदीप पाटील,प्रवीण पाटील,जगन्नाथ पाटील,विश्वनाथ चौधरी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments