शहरातील सावेडी उपनगरात गोळीबार एकच खळबळ.. सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (दि.२):-शहराच्या सावेडी उपनगरातील ...
शहरातील सावेडी उपनगरात गोळीबार एकच खळबळ..
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.२):-शहराच्या सावेडी उपनगरातील तपोवन रोडवर ढवनवस्तीमध्ये रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान घडलेली घटना संपूर्ण शहराला हादरवून टाकनारी असून किरकोळ वादातून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.प्राथमिक माहितीनुसार ढवनवस्तीमध्ये दोन स्थानिक गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला हा वाद सुरुवातीला तोंडावरून बोलणे झगडणे यापुरता मर्यादित होता परंतु रात्री एका गटाकडून शस्त्र हातात घेऊन अचानक हवेत गोळ्या झाडण्यात आल्या.रात्री उशिरा झालेल्या या गोळीबारामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला भयभीत नागरिक घराबाहेर धावत आले घटनेची माहिती मिळतात तोफखाना पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.प्रमोद रामदास घोडके (रा.ढवणवस्ती तपोवन रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल सांगळे,मयूर फणसे,आकाश ससाने,कुणाल मराठे,भीमराज आव्हाड यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments