राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे सेवा निवृत झालेल्या मान्यवरांचा सत्कार चोपडा येथील विश्राम गृहात राष्ट्रीय चर्मकार . महासंघातर्फे मान्यव...
राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे सेवा निवृत झालेल्या मान्यवरांचा सत्कार
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा -:- येथील विश्राम गृहात शिक्षण विस्तार अधिकारी पदी सेवा निवृत्त झालेले उत्तम चव्हाण व गोरगावले येथील मुख्याध्यापक पदी सेवा निवृत्त झालेले सिताराम वाघ तसेच रिंगणगांव येथून प्राथमिक आरोग्य केंद्रातून सेवा निवृत्त झालेले कार्तिक विसावे व यावल येथे पंचायत समितीत कृषी विभागात विस्तार अधिकारी पदी प्रमोशन मिळालेले रमेश विसावे व धरणगाव येथील पंचायत समितीत . कृषी विभागात विस्तार अधिकारी पदी प्रमोशन मिळालेले योगेंद्र अहिरे या मान्यवराचा सत्कार आज राष्ट्रीय चर्मकार महासंघ चोपडा यांच्या तर्फे करण्यात आला
यावेळी उत्तम चव्हाण यांनी आपल्या 38 वर्षाच्या सेवे बद्दल व आलेल्या अनुभवांबद्दल सविस्तर माहिती सांगितली तसेच योगेंद्र अहिरे यांनी ही मार्गदर्शन केले
यावेळी सेवा निवृत्त व प्रमोशन झालेल्या मान्यवरांचा सत्कार राष्टीय चर्मचार महासंघाचे चोपडा तालुका अध्यक्ष सोपान मोरे रोहिदास मोरे इंजिनियर संतोष बाविस्कर संघटन प्रमुख छोटू विसावे संजय वाघ आदि मान्यवरांनी केला
यावेळी डिगंबर सोनवणे निलेश वाघ समाधान शिरसाठ परेश चित्ते रविंद्र मोरे संदिप अहिरे सचिन विसावे सुर्यप्रकाश बाविस्कर जितेंद्र विसावे मंगल चव्हाण अजय विसावे मनोज वाघ रुपेश अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोपान मोरे यांनी केले तर सुत्र संचलन व आभार डिगंबर सोनवणे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य केले.

No comments